💥श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथील मुख्य पुजारी मोहन बडवे,चिन्मय बडवे यांची नाथ शिक्षण संस्था कार्यालयास भेट....!


💥यावेळी संस्थेचे सहसचिव प्रदिप खाडे यांनी शाल श्रीफळ देऊन स्वागत करून सत्कार करण्यात आला💥

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथील मुख्य पुजारी मोहन बडवे, चिन्मय बडवे, अजित बडवे, अनिल बडवे यांनी बुधवार दि.१८ जानेवारी रोजी नाथ शिक्षण संस्थेच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी संस्थेचे सहसचिव प्रदिप खाडे यांनी शाल श्रीफळ देऊन स्वागत करून सत्कार करण्यात आला.

         महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत असलेला शिव पूजेचा सर्वोच्य सोहळा , कोटी लिंगार्चन व लक्ष भोजन सोहळा या  सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी शिखर शिंगणापूर येथील मुख्य पुजारी व तीर्थक्षेत्र फाऊंडेशन चे सदस्य श्री मोहन बडवे, अनिल बडवे, चिन्मय बडवे, अजित बडवे हे परळी येथे आले होते. नाथ शिक्षण संस्था कार्यालयास भेट दिली. यावेळी त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य अतुल दुबे, श्रीनिवास मुंडे, हरिष नागरगोजे व फड आदी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या