💥हिंगोली जिल्ह्यातील कडोळी येथील शालेय पोषण आहारात आळ्या आढळल्याची गंभीर घटना...!


💥शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार उघडकीस💥


शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील कडोळी येथील केंद्रीय प्राथमिक शाळा कडोळी येथील शालेय पोषण आहारामध्ये आज दि 05/01/2023 रोजी  वटाणा यामध्ये अतिशय निकृष्टपणा आढळून आला व वटाण्यामध्ये आळ्या निघाल्या व जवळपास 30 ते 35 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली व त्या विद्यार्थ्याला ताबडतोब गोरेगाव या ठिकाणी उपकेंद्रात हलविण्यात आले यामध्ये विद्यार्थ्याला पोट दुखणे उलट्या होणे असे जाणू लागले शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या व्यक्तीचा निष्काळजीपणा व मुख्याध्यापक यांचे न राहिलेले नियंत्रण या दोन गोष्टीमुळे हा असा प्रकार घडला योगायोग असा की कोणतीही विध्यार्थीना जीवित हानी झाली नाही  त्यामुळे मोठा अनर्थ ठळला या  ठिकाणची  बातमी कळताच गोरेगाव उपकेंद्राचे कर्मचारी गोरेगाव पोलीस स्टेशनचे पीआय सर व शिक्षणाधिकारी यांनी विचारपूस केली व ताबडतोब अधिकाऱ्याने अंबुलींची व्यवस्था केली. यावेळी गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.


या ठिकाणी गावकऱ्यांनी रोश व्यक्त केला व संबंधितावर ताबडतोब कारवाई करावी अन्यथा शिक्षणाधिकारी व co साहेब यांच्या दालनात हेच वाटाणे आल्याचे घेऊन शाळा भरवली जाईल असे गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला या अगोदरही असा छोटासा प्रकार घडला होता पण शालेय  व्यवस्थापन समितीने शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या एक चान्स द्यायचे असे ठरले होते परंतु हो हा पोषण आहार शिजवणारा व्यक्ती अशा प्रकारचे कृत्य करतच आहे तरी याच्यावर सुद्धा ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या