💥परभणी जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेतील कर्तव्यदक्ष कर्मचारी मिलिंद रामभाऊ कांबळे जिल्हा पोलिस अधिक्षकांकडून सन्मानीत...!


💥प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ट कामगिरी बजावल्या बद्दल जिल्हा पोलिस अधिक्षक रागसुधा आर.यांनी केला सन्मान💥


परभणी/पुर्णा (दि.२६ जानेवार) - परभणी जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचारी मिलिंद रामभाऊ कांबळे यांच्या कार्यतत्परतेची दखल घेऊन व अनेक गुन्ह्याच्या तपासात उल्लेखनीय कामगिरी बजावल्या बद्दल त्यांचा आज गुरुवार दि.२६ जानेवारी २०२३ रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून परभणी जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधिक्षक आयपीएस श्रीमती रागसुधा आर.यांनी सन्मानपत्र व पुरस्कार देऊन यथोचित सन्मान केला.

पुर्णा शहरातील रहिवासी असलेले व तालुक्यात सामाजिक बांधिलकी जोपासत आपल्या कर्तव्याशी सदैव एकनिष्ठ राहणारे अत्यंत मनमिळावू व कर्तृत्ववान व्यक्तीमत्व म्हणून परिचित असलेले मिलिंद रामभाऊ कांबळे यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे......   टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या