💥मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वपक्षीय खासदारांची बैठक संपन्न....!


💥केंद्रीय अर्थसंकल्प-2023/24 या वर्षाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन💥


केंद्रीय अर्थसंकल्प-2023/24 या वर्षाच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्वपक्षीय लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत काल सोमवार दि.३० जानेवारी २०२३ रोजी संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे झाली केंद्रीय मंत्री नारायण राणे,डॉ.भारती पवार, डॉ. भागवत कराड, कपिल पाटील यांच्यासह अनेक खासदार तसेच राज्य मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित होते.


महाराष्ट्राच्या विकासाचे प्रकल्प, योजना यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद व्हावी, महाराष्ट्र हिताच्या कामांचा पाठपुरावा खासदार व केंद्रीय मंत्र्यांनी दिल्लीत करावा तसेच केंद्र शासनाचा योजनांची अंमलबजावणी राज्यात गतीने होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा अपेक्षा यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी व्यक्त केल्या.


* उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले की :-


✔️संसदीय आयुधांचा वापर करून खासदारांनी महाराष्ट्राचे जास्तीत जास्त प्रश्न अधिवेशनात मांडावेत.

✔️ पंतप्रधान आवास योजनेतील पैसे रखडले होते. पण आपण याचा पाठपुरावा सुरू केला असून केंद्राकडून 1400 कोटी रुपये मिळाले आहेत. आणखीही लवकरच मिळतील.

✔️सर्व खासदारांनी केलेल्या सूचनांची नोंद घेतली असून राज्य सरकार त्यावर वेगाने काम करेल....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या