💥औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत परभणी जिल्ह्यात सरासरी 90.17 टक्के मतदान....!


💥जिल्ह्यातील एकूण 18 मतदान केंद्रांवर सकाळी 8-00 ते दुपारी 04-00 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली💥


परभणी (दि.30 जानेवारी) : औरंगाबाद शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी आज परभणी जिल्ह्यातील 18 मतदान केंद्रांवर सरासरी 90.17 टक्के मतदान झाले असल्याचे जिल्हाधिकारी तथा सहायक जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी सांगितले.



  
जिल्ह्यातील एकूण 18 मतदान केंद्रांवर सकाळी 8-00 ते दुपारी 04-00 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. परभणी जिल्ह्यात एकूण 4 हजार 568 शिक्षक मतदार असून त्यामध्ये 3 हजार 867 पुरुष तर 701 स्त्री मतदारांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी सकाळी मतदान केंद्रावर भेट देत पाहणी केली. तसेच अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) निवृत्ती गायकवाड यांनीही जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे मतदान प्रक्रियेची पाहणी केली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या