💥पुर्णा तालुक्यातील पांगरा ढोणे येथे 75 व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन....!


💥पांगरा ढोणे येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे मागील 75 वर्षापासून सातत्याने आयोजन💥  

पूर्णा (दि.18 जानेवारी) - तालुक्यातील पांगरा ढोणे येथे ब्रह्मीभूत ब्रह्मचैतन्य स्वानंद सुख निवासी श्री संत मोतीराम महाराज यांनी गेल्या 75 वर्षांपूर्वी सप्ताहाची सुरुवात करून दिलेली  आजही ती परंपरा कायम असून मंगळवार दिनांक 24 जानेवारी ते बुधवार 1 फेब्रुवारी यादरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

 यामध्ये पहाटे 4ते 6 काकड आरती भजन 6 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण 10 ते1 तुकाराम गाथा भजन 12 ते 3 श्रीमद् भागवत कथा,3 ते 4 ज्ञानेश्वरी प्रवचन,6ते7हरीपाठ,9ते11हरी किर्तन, नंतर हरी जागर,मंगळवार 24 रोजी ह.भ.प. अंगद महाराज आळंदीकर. तर प्रवचन ह.भ.प. बबन महाराज मुडीकर, बुधवार 25रोजी ह.भ.प. दताञय महाराज महाराज चौंढीकर ,तर प्रवचन ह.भ.प. दिपक गुरु महाराज पांगरेकर, गुरुवार 26रोजी ह.भ.प.प्रकाश महाराज साखरे परभणी.तर प्रवचन ह.भ.प.अंनत महाराज बेटकर हीवरा,शुकवार 27 रोजी अनाथांचे मायबाप ह.भ.प.माणिक महाराज रेंगे परभणी,तर प्रवचन ह.भ.प.हरी गुरुजी बुचाले आव्हईकर, शनिवार 28 रोजी हभप नामदेव महाराज पफाळ सोनपेठ,तर प्रवचन ह.भ.प.गुलाब महाराज निळेकर, रविवार 29रोजी ह.भ.प. न्याय व विधी तज्ञ अँड यादवराव महाराज डाखोरे वाईकर,तर प्रवचन ह.भ.प.संतराम महाराज पांगरा, सोमवार 30रोजी ह.भ.प. विनोदाचार्य भगवान महाराज शेंद्रेकर परभणी,तर प्रवचन ह.भ.प. भगवान गुरुजी ढोणे पांगरा, मंगळवार 31रोजी सकाळी आठ ते दहा श्री संत मोतीराम महाराज यांच्या प्रतिमेची व श्रीमद् भागवत ग्रंथाची भव्य मिरवणूक टाळ मृदंगाच्या गजरात निघेल. दुपारी 2 ते 4 या वेळात ह. भ. प. निवृत्तीनाथ महाराज ईसादकर. यांचे पूजेचे कीर्तन होईल नंतर सर्व भक्तांसाठी महाप्रसाद होईल. सायंकाळी सात वाजता वैराग्यमूर्ती सोपान काका ईसादकर यांच्या स्मरणार्थ दीप महोत्सव होईल महंत 1008 जीवनदासजी महाराज चुडावेकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडेल व रात्री ह भ प ज्ञानेश्वर महाराज पांचाळ  पुर्णा यांचे कीर्तन होईल व रात्रभर उपस्थित महाराजांचे कीर्तन होतील व पहाटे 3 ते 6 ज्ञानोबा माऊली मुडेकर यांचे कीर्तन होईल बुधवार 1 फेबुररी रोजी दिवसभर सकाळी 10वाजल्यापासुन  हरी कीर्तनाला सुरुवात होईल ह.भ.प.भगवान महाराज लहानकर.भागवत महाराज फळेकर , रामचंद्र महाराज औंढेकर , अनंत महाराज नादरे पद्मावती संस्थान.व उपस्थित महाराजांचे किर्तन होतील.दुपारी 2ते 4 ज्ञानोबा माऊली मुडेकर .व 4 ते 6 गुरुवर्य अच्युत महाराज दस्तापुरकर यांचे कीर्तन होईल व त्यांच्या हस्ते आरती होईल आणि या कार्यक्रमाची सांगता होईल तरी पंचक्रोशीतील भाविकांनी या कीर्तन श्रवणाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थ मंडळी पांगरा ढोणे यांनी केले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या