💥परभणीच्या 'स्वराज्य ट्रेकर्सने' आयोजित केलेल्या मोहिमेत सहभागी 35 मावळ्यांनी केले कळसूबाई शिखर पार....!


💥स्वराज्य ट्रेकर्सच्या मोहिमेत माजलगावचे गिर्यारोहकही सहभागी💥

परभणी (दि.09 जानेवारी) - परभणी येथील स्वराज्य ट्रेकर्सने आयोजित केलेल्या मोहिमेत सहभागी 35 मावळ्यांनी कळसूबाई शिखर सर करीत हरिश्चंद्रगडावरही चढाई केली. विशेष म्हणजे यात 2 बालकेदेखील सहभागी झाले होते.

थंडीच्या वातावरणात दूरवर पसरलेली ढगांची चादर, त्यात ताठ मानेने उभे असलेले सह्याद्रीतील अभेद्य सुळके, महाराष्ट्रातील एव्हरेस्ट अशी ओळख असलेले ’कळसुबाई शिखर’, सभोवतालचे अभयारण्य, आदी डोळ्यांची पारणे फेडणारा नजारा पहायचा, तर हरिश्चंद्रगडाला भेट द्यायला हवीच, असे प्रत्येक गिर्यारोहकाचे जणू स्वप्न असते. हीच संधी टेकर्सना मिळावी म्हणून ’स्वराज्य ट्रेकर्स परभणी’चे प्रमुख मार्गदर्शक राजेश्वर गरुड आणि माजलगाव (जि.बीड) येथील जाँबाज ट्रेकर्सचे प्रमुख विजयसिंह सोळंके यांनी 6, 7 आणि 8 जानेवारी रोजी ’हरिश्चंद्रगड, सांदण व्हॅली व कळसूबाई ट्रेक’चे आयोजन केले होते. परभणीहून 29 मोठे व 2 बालगिर्यारोहक 6 जानेवारीला पहाटे मोहिमेसाठी रवाना झाले. दुपारी सर्वजण अहमदनगर जिल्ह्यातील पाचनई गावात पोहोचले. लगेच हरिश्चंद्रगड चढायला सुरुवात करण्यात आली. ज्याचा इतिहास कुतूहलजनक, तर भूगोल विस्मयकारक आहे, असा विलक्षण महत्त्व लाभलेला दुर्ग म्हणजे हरिश्चंद्रगड. या हरिश्चंद्रगडाला भेट देण्यासाठी चहा-पाणी करून ट्रेकला सुरुवात करण्यात आली. हरिश्चंद्रगडावर पोचून त्यावरील वास्तू आणि त्यांचा इतिहास समजून घेण्यात आला. हरिश्चंद्रेश्वराचे प्राचीन मंदिर, केदारेश्वराची गुंफा, काळू नदीचे उगमस्थान, भव्य कोकणकडा आदी गडावरील ठिकाणांना भेट देत तिथला इतिहास उलगडणारा हा ट्रेक अनुभवला. पहिल्या दिवशीचा मुक्काम गडावरच टेन्टमध्ये करण्यात आला. दुसर्‍या दिवशी शनिवारी दि.8 जानेवारीला सर्वांनी पहाटे लवकर उठून गडावरून आणखी उंच असलेले तारामती शिखर चढायला सुरूवात केली. त्याठिकाणी सुर्योदय पाहण्यासाठी सर्वजण थांबले. परंतू ढगाळ वातावरणाने सुर्यदर्शन  झाले नाही. त्यामुळे सर्वांनी खाली उतरून जेवण करून गड उतरायला सुरूवात केली. त्यानंतर सर्वजण सांदण व्हॅलीकडे वाहनातून रवाना झाले. अद्भुत सांदण व्हॅलीत उतरून माहिती घेतल्यानंतर सर्व गिर्यारोहक त्याच गावातील तळ्याकाठी उभारलेल्या टेन्टच्या ठिकाणी मुक्कामी पोहोचले. तिसर्या दिवशी सकाळी सर्वजण अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील बारी गावाजवळील जहागीरदारवाडी येथे पोहोचले. सकाळी लवकर सर्व ट्रेकर्सनी कळसूबाई शिखर चढायला प्रत्यक्ष सुरुवात केली. सकाळी 10 वाजेपर्यंत सर्वांनीच हे अत्युच्च शिखर सर केले. शिखरावरुन निसर्ग सौंंदर्य पाहत व काही ठिकाणांना भेटी देत ही मंडळी दुपारी 2 वाजता खाली उतरायला निघाली. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सर्व ट्रेकर्स गडावरून खाली उतरले आणि परतीच्या प्रवासाला निघाले.

परभणीहून स्वराज्य ट्रेकर्सचे मोहीम प्रमुख राजेश्वर गरुड, व्यंकटेश शिंदे, प्रसाद गरुड, सुंदरराव गरुड, किशोर सोळंके, वरद सोळंके, राम गरूड, अशोक पवार, धनंजय गरुड, माणिकराव गरुड, संतोष अवतारे, राम पवार, सुधीर देशमुख, उत्तमराव आहेर, श्रीकांत गरुड,  प्रभाकर गायकवाड, बाळासाहेब काळे, अ‍ॅड.सोमनाथ व्यवहारे, कल्याण अवचार, अ‍ॅड.कैलास मोरे, विकास मोरे हे मोहिमेत सहभागी झाले.

तसेच जाँबाज ट्रेकर्स माजलगावचे प्रमुख विजयसिंह सोळंके, मोहीम प्रमुख महेश सगरे, निलेश काकडे, मनिष तौर, नितिन शेंडगे, अविनाश फपाळ, सागर बोबडे, वैजनाथ हुंबे, बप्पा उगले, संकेत जोगडे, अमोल शेजुळ, कुलदीप सोळंके, प्रसाद झगडे,  विकास दाभाडे यांनी या मोहिमेत भाग घेतला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या