💥परभणी जिल्ह्यासाठी 1 हजार 239 क्विंटल साखरेचे नियतन प्राप्त.....!


💥जिल्ह्यासाठी यशस्वी साखर पुरवठादार म्हणून जस्टकिचन प्रा.लि. यांची निवड करण्यात आली आहे💥

परभणी (दि.27 जानेवारी) :- जिल्ह्यात जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 2023 या तीन महिन्यासाठी 1 हजार 239 क्विंटल साखरेचे नियतन प्राप्त झाले आहे. परभणी जिल्ह्यासाठी यशस्वी साखर पुरवठादार म्हणून जस्टकिचन प्रा.लि. यांची निवड करण्यात आली आहे.

साखर नियतन क्विंटलमध्ये तालुका व गोदामनिहाय पुढीलप्रमाणे आहे. परभणी-330, पुर्णा-122, पालम-94, गंगाखेड-132, सोनपेठ-60, पाथरी-96, सेलू-156, मानवत-80, जिंतूर-114, बोरी-55 याप्रमाणे तिमाही साखर नियतन प्राप्त झाले आहे. साखर नियतन फक्त अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना प्रतिमहा प्रति कुटूंब (प्रति शिधापत्रिका) एक किलो याप्रमाणे आहे. साखरेचा विक्री दर प्रति किलो 20 रुपये किरकोळ दराने वाटप करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी कळविले आहे.......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या