💥हिंगोलीत उद्या मंगळवार दि.03 जानेवारी पासून जिजाऊ व्याख्यानमालेला सुरुवात....!


💥मराठा सेवा संघाचा पुढाकार : व्याख्यानमालेचे 24 व्या वर्षात पदार्पण💥

✍🏻शिवशंकर निरगुडे - हिंगोली 

हिंगोली (दि.02 जानेवारी) - मराठा सेवा संघ व संलग्लित कक्षाच्या वतीने गेल्या 23 वर्षापासून सावित्री, जिजाऊ, दशरात्रोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत आहे. दि. 3, 4 व 5 जानेवारी रोजी ही व्याख्यानमाला येथील कै. शिवाजीराव देशमुख सभागृहात रोज सायंकाळी 7.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे. 

मागील 23 वर्षापासून महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याते, विचारवंत यांच्या वतीने विविध 69 विषयांवर प्रबोधन करण्यात आले आहे 3 जानेवारी रोजी " समाज परिवर्तन व वर्तमानातील युवती " या विषयावर जगद‍्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. निर्मलाताई पाटील मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बालकल्याण समिती सदस्या अ‍ॅड. वैशाली देशमुख, उद्घाटिका म्हणून अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील तर प्रमुख पाहुण्या म्हणून प्रिती मापारी व प्रायोजिका वर्षाताई सरनाईक यांची उपस्थिती राहणार आहे. 4 जानेवारी रोजी " मराठवाडा मुक्‍तीच्या अमृत महोत्सवानिमित्त हैद्राबाद मुक्‍तीसंग्राम समजुन घेताना " या विषयावर प्रा. डॉ. बालाजी चिरडे मार्गदर्शन करणार आहेत. अध्यक्ष म्हणून पोलीस अधिक्षक जी श्रीधर, उद्घाटक म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी एस. एन. जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी व प्रायोजक बाबाराव श्रृंगारे उपस्थित राहणार आहेत. 5 जानेवारी रोजी " राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, राजर्षी शाहु महाराज यांचा विचार, वारसा व आजचा तरूण " या विषयावर विक्रम कदम हे मार्गदर्शन करणार आहेत. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, उद्घाटक जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय वन अधिकारी बाळासाहेब कोळगे व प्रायोजक मारोतराव बुद्रूक पाटील उपस्थित राहणार आहेत. दरम्यान या व्याख्यानमालेने यंदा 24 व्या वर्षात पदार्पण केले असून उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या