💥नांदेड येथील प्रभात नगर येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वानी दिना निमित्त रक्तदान शिबिर संपन्न...!


💥रक्तदान शिबीराचे १५ वे वर्ष : महापरिनिर्वान दिनी धम्मा श्रय युवा विचार मंच द्वारा प्रत्येक वर्षी आयोजित केले जाते रक्तदान शिबीर💥


नांदेड (दि.०९ डिसेंबर) - भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिना निमित्त नांदेड शहरातील प्रभात नगर येथे धम्मा श्रय युवा विचार मंचाकडून प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी महापरिनिर्वान दिनी रक्तदान शिबीराचे आयोजन करून महामानवास आंदरांजली वाहण्यात आली या रक्तदान शिबीराचे १५ वे वर्ष आहे.


या भव्य रक्तदान शिबीरास भाग्यनगर पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक सुधाकर आढे,विमानतळ पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक अनिरुद्ध काकडे,प्रसिध्द बालरोग तज्ञ डॉ संग्राम जोंधळे,जिल्हा जात पडताळणी स.म.कर्मचारी सोनू दरजगावकर,जेष्ठ नेत्या,सामाजिक कार्यकर्त्या भारतीबाई सदावर्ते,प्रभात नगर मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्था चेअरमण शंकर निवडंगे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.


धम्मा श्रय युवा विचार मंच द्वारा आयोजित या रक्तदान शिबीरात १०० पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले यानंतर धम्मा श्रय युवा विचार मंच संघटनेकडून सायंकाळच्या सुमारास प्रभात नगर परिसरात 'पणती ज्योत रॅली' काढण्यात आली होती या रॅलीत असंख्य उपासक उपासिकांसह आंबेडकरवादी बांधवांनी सहभाग नोंदवला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या