💥जिंतूर नगरीत वेदांत केसरी संत श्री रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन....!


💥किर्तन प्रवचन आणि ज्ञानेश्वरी पारायण भागवत कथा अखंड हरिनाम आदी कार्यक्रमाचे आयोजन💥

जिंतूर प्रतिनिधी  /  बि.डी.रामपूरकर

परभणी जिल्ह्याचे जन्मदाते तथा वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ अर्धायु वेदांत केसरी ब्रह्मलीन श्री रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त जिंतूर शहरात श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन सिद्धेश्वर मंदिर येथे वैकुंठवासी ह भ प नथुराम बाबा केहाळकर यांनी सुरू केलेला सप्ताह दिनांक दिनांक 13 डिसेंबर पासून सुरू झाला असून या सप्ताहात दररोज किर्तन प्रवचन आणि ज्ञानेश्वरी पारायण भागवत कथा अखंड हरिनाम आदी कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे यावर्षीही करण्यात आले आहे. 

दरम्यान श्रीनगरेश्वर मंदिर येथेही गुरुजींच्या पुण्यतिथीनिमित्त 18 डिसेंबर पासून भागवत कथा सप्ताह प्रारंभ होत असून आज 16 डिसेंबर पासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण स्वामी महेश महाराज जिंतूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले असून या दोन्ही सप्ताहात दररोज रात्री थोर कीर्तनकार प्रसिद्ध वक्त्यांची सुश्राव्य अशी कीर्तन होणार असून या भागवत कथेत बीड येथील ह भ प अमृत महाराज जोशी यांची भागवत कथा श्रवण करण्यासाठी भक्तांना मिळणार आहे 

भागवत ग्रंथ शोभायात्रा दि 18 डिसेंबर रोजी तर दि.19 डिसेंबर पुण्यतिथी दिनी भव्य दिव्य शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गावरून निघणार आहे  यात सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन महेश महाराज जिंतूरकर  यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या