💥पुर्णेतील गौण खनिज घोटाळा : अवैध स्टोन क्रेशर खानपट्टे सिल नाट्याचे सोपस्कार पुर्ण परंतु पुढील कारवाई गुलदस्त्यात ?


💥तालुक्यातील महसुल प्रशासनाने सिल केलेल्या स्टोन क्रेशर खानपट्यातून अद्यापही बेकायदेशीर उत्खननासह गिट्टी निर्मिती💥


परभणी/पुर्णा (दि.२३ डिसेंबर) - परभणी जिल्हा महसुल व गौण खनिज विभागाच्या डोळ्यात धुळ झोकण्यासाठी स्थानिक तहसिलदार व महसुल प्रशासन गौण खनिज विभागातील अधिकाऱ्यांशी संगणमत करीत गौण खनिज विभागाच्या दफ्तरी सहा स्टोन क्रेशर खानपट्टे बंद असल्याची नोंद करून तर काहींची मुद्दत संपल्यानंतर देखील त्यांचे परवाने नुतनीकरणा संदर्भात त्यांना नोटीसी न बजावता त्यांची स्टोन क्रेशर खानपट्टे शासकीय नियमा प्रमाणे सिल न करता त्यांना सातत्याने प्रचंड प्रमाणात अवैधरित्या उत्खननासह बेकायदेशीर स्टोन क्रेशर चालवण्याची संधी बहाल करण्यास तहसिलदार तसेच महसुल प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह त्या भागातील ग्रामसेवक,तलाठी,गिरधावार,सपंच देखील जवाबदार असल्यामुळे जिल्हाधिकारी सन्माननीय आंचल गोयल यांनी तात्काळ या गौण खनिज घोटाळ्याची चौकशी करून उत्खनन झालेल्या खानपट्यांची रुंदी खोली उंची आदींची इटीएस मशीनद्वारे शासनाचा बुडालेला कोट्यावधी रुपयांचा महसुल वसूल करावा अशी मागणी जनसामानूयांतून होत आहे.


पुर्णा तालुक्यात मागील वर्षापासून सातत्याने तेरा ते चौदा स्टोन क्रेशर खाणपट्टा राजरोसपणे स्फोटकांद्वारे प्रचंड प्रमाणात उत्खनन करीत गिट्टी/डस्टची निर्मिती करीत शासनाच्या लाखो रुपयांच्या महसुलासह इन्कम टेक्स/सेल टेक्स सह जिएसटीला देखील चुना लावत असतांना प्रशासनातील झारीतील शुक्राचार्य बिना परवाना चालणाऱ्या बेकायदेशीर स्टोन क्रेशर खानपट्टा धारकांना संधीचे सोने करीत...शुकर हैं जनाब म्हणत या गौण खनिज घोटाळ्यावर पडदा टाकण्याचेच कृत्य करीत होते परंतु या गंभीर प्रकरणा विरोधात प्रसार माध्यमांनी आवाज उठवताच स्थानिक तहसिलदार टेमकर व महसुल प्रशासनाने बिना परवाना चालणारे अवैध स्टोन क्रेशर खानपट्टे सिल करण्याचे आदेश जारी केले ठरल्या प्रमाणे दि.१६ डिसेंबर २०२२ रोजी अवैध स्टोन क्रेशर खानपट्टे सिल करण्याचे नाट्य तर सोईस्कररित्या रंगवण्यात आले परंतु स्टोन क्रेशर धारकांनी प्रचंड प्रमाणात उत्खनन करीत स्टोन क्रेशर द्वारे तयार केलेल्या गिट्टीची विल्हेवाट लावण्यासाठी संबंधित अवैध स्टोन क्रेशर धारकांना तिन दिवसांची संधी देत दि.१९ डिसेंबर २०२२ रोजी परभणी जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांना कारवाई संदर्भात पत्र पाठवण्याचा सोपस्कार देखील पुर्ण करण्यात आला.

पुर्णेच्या तहसिलदार टेमकर व महसुल प्रशासनाने सिल केलेल्या चौदा स्टोन क्रेशरांमध्ये तालुक्यातील खडाळा परिसरातील ०६ बिना परवाना अवैध स्टोन क्रेशर तर तालुक्यातील आडगाव (ला.) येथील ०२ बिना परवाना अवैध स्टोन क्रेशर,आडगाव (सु.) येथील पुर्णा न.पा.च्या मा.नगरसेवकाचे ०१ अवैध स्टोन क्रेशर,भाटेगाव येथील माजी झेडपी सदस्याच्या सुपुत्राचे ०१ अवैध बिना परवाना स्टोन क्रेशर,कांजनापूर येथील ०१ अवैध बिना परवाना स्टोन क्रेशर,महातपुरी येथील ०१ अवैध बिना परवाना स्टोन क्रेशर,कानखेड येथील प्रसिध्द शासकीय गुत्तेदाराचे ०१ अवैध बिना परवाना स्टोन क्रेशर,गौर येथील ०१ अवैध स्टोन क्रेशर अश्या एकून १४ स्टोन क्रेशरांचा समावेश असून संबंधित अवैध बिना परवाना स्टोन क्रेशर सिल करतेवेळी संबंधित मंडळ अधिकारी/तलाठी आदींनी स्टोन क्रेशर वरील खोल्यांना सिल लावण्याचे सोपस्कार पुर्ण करीत अवैध उत्खननाकडे सोईस्कररित्या डोळेझाक करीत एकप्रकारे अवैध स्टोन क्रेशर चालकांना सुवर्णसंधीच प्राप्त करुन दिल्याचे बोलले जात आहे....... 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या