💥राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.आ.जयंतराव पाटील यांचे सभागृहातील निलंबन तात्काळ मागे घ्या....!


💥जिंतूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवेदनाद्वारे केली मागणी💥 

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

 जिंतूर :- (दि.२४ डिसेंबर) - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. आ.जयंतराव पाटील यांचा आवाज दाबण्याच्या हेतूने हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत सरकारने त्याच्यावर केलेल्या अन्यायकारक निलंबनाचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जिंतूरच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.आ.जयंत पाटील हे मुळात अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. परंतु लोकशाहीचा व सत्याचा आवाज दाबण्याचे काम भाजप व शिंदे सरकार नेहमीच करत आहेत. याच अनुषंगाने या सरकारने मा.आ.जयंत पाटील यांचे जाणीवपूर्वक अधिवेशन होईपर्यंत दोन्ही सभागृहातून निलंबन केले आहे. मा.आ.जयंत पाटील यांच्यावरील निलंबन तात्काळ रद्द करून त्यांना सन्मानपूर्वक सभागृहात प्रवेश द्यावा अन्यथा येणाऱ्या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष जिंतूर तालुक्याच्या वतीने मोठ्या प्रमाणात लढा उभारून तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी निवेदनात देण्यात आला आहे.

माननीय नामदार श्री जयंत पाटील यांना विधानसभा व विधान परिषद दोन्ही सभागृहामध्ये सूडबुद्धेने कारवाई करणाऱ्या भाजप सरकारच्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिंतूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येलदरी रोड जिंतूर येथे आंदोलन करण्यात आले माननीय आमदार श्री जयंत पाटील यांच्यावर केलेली कारवाई तात्काळ मागे घेण्यात यावी या मागणीसाठी जयंत पाटील यांच्या घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून टाकला.

  यावेळी रामराव उबाळे, बाळासाहेब भांबळे, मनोज थिटे, पृथ्वीराज भांबळे, नगरसेवक शाहेद बेग मिर्झा, दलमीर पठाण, दत्ताभाऊ काळे, लखुजी जाधव, चंद्रकांत बहिरट, संजय (बंटी) निकाळजे,अहमद बागवान, इस्माईल शेख,माजी जिल्हा परिषद सदस्य विजय वाकळे, यांच्यासह शंकर माने पंडित जाधव, गजानन कुटे, अविनाश मस्के, दत्ता नवले, सुरेश वाकळे, अकबर कुरेशी, सोहेल सर,अरबाज कौठेकर,शोयब खान यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या