💥पुर्णा शहरात घाणीचे साम्राज्य : नगर परिषद मुख्याधिकारी अजय नरळे यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष....?


💥शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात : तात्काळ स्वच्छतेकडे लक्ष देण्याची निवेदनाद्वारे मागणी💥


पूर्णा (दि.१४ डिसेंबर) : शहरातील सार्वजनिक मुतारी स्वच्छ करून दुरुस्त करणे व तसेच शहरातील विविध भागातील स्वच्छते अभावी तुडुंब भरलेल्या नाल्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्यामुळे शहरातील  विविध भागांतील उकरड्यांसह नाल्या देखील स्वच्छ करण्यात याव्यात या मागणीसाठी नगर परिषद मुख्याधिकारी अजय नरळे यांना निवेदन देण्यात आले.


पूर्णा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी भाजी मंडई लगत असलेली सार्वजनिक मुतारीतून  येणाऱ्या दुर्गंधीच्या वासाने नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत मुतारी अस्वच्छ असल्यामुळे तिथून जवळून रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधी सुटत असलेल्या वासाने नाका तोंडाला रुमाल लावून मार्गक्रमण करावे लागत आहे सदरील मुतारी योग्य रीतीने स्वच्छ करण्यात यावी व तसेच मलमूत्र वाहून जाण्यासाठी नळ  पाण्याची व्यवस्था करण्यात यावी दररोज निर्जंतुकीकरण  औषधी अथवा फिनेल टाकून स्वच्छ करावे मुतारीच्या शेजारी भिंती लगत  घाणीचे साम्राज्य पसरलेले असते ते दररोज स्वच्छ करावे मुतारीच्या घाणीने डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे तसेच जवळच भाजी पाला, फळे व फुलाचे मार्केट असून माशा व डास त्या भाजीपाल्यावर जाऊन बसतात त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे. एकीकडे रोगांनी बदललेल्या हवामानामुळे नागरिक त्रस्त असताना दुसरीकडे शहरातील ठिकठिकाणी पसरलेल घाणीच साम्राज्य यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे मुतारीची तात्काळ दुरुस्ती करून येथे नळ पाण्याची व्यवस्था  मलमूत्र  वाहून जाण्यासाठी तेथील नाल्या दुरुस्ती करण्यात याव्यात तसेच शहरामध्ये  विविध भागांमध्ये नाली तुडुंब भरल्या असून नाल्या स्वच्छ करण्यात याव्यात नालीचे   पाणी वाहत नसल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे  तसेच संपूर्ण शहरांमध्ये धूर फवारणी करण्यात यावी मुख्याधिकारी साहेबांनी वरील विषय गांभीर्याने घेऊन आपले शहर स्वच्छ व सुंदर शहर हा उपक्रम राबवण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशील गायकवाड शेख जुबेर शेख हबीब जगजागृती सेनेचे अध्यक्ष अनिल नरवाडे यांनी एका निवेदनात केली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या