💥परभणी जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन....!


💥ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे उद्या बुधवार दि.२१ डिसेंबर ते २२ डिसेंबर रोजी आयोजन💥

परभणी (दि.20 डिसेंबर) : जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

जिल्ह्यातील सुशिक्षित बेराजगार युवक-युवतींसाठी खाजगी क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी यांच्या विद्यमाने बुधवार (दि. २१) व गुरुवार (दि.२२) रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

  या मेळाव्यास विविध नामांकित उद्योजक सहभाग नोंदविणार आहेत. तरी जिल्ह्यातील बेराजगार युवक- युवतींनी लाभ घेण्यासाठी रोजगार मेळाव्यामध्ये नाव नोंदणी करून ऑनलाईन सहभाग नोंदवावा. नाव नोंदणी  mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावर करावी, असे आवाहन कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त प्र.सो.खंदारे यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या