💥बालिका व बालक लैंगिक अत्याचारापासून सुरक्षित ठेवणे ही सर्वांची जबाबदारी - डॉ.भारती गोमसे


💥प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ भारती गोमसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले💥

 पूर्णा : येथील श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, समान संधी केंद्र तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभागाअंतर्गत "बाल लैंगिक शोषण थांबविण्यासाठी POSCO कायदा - 2012, आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध सहभागींचे पूर्व आणि नंतरचे मूल्यांकन" या विषयावर ऑनलाइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ भारती गोमसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

बाल लैंगिक शोषण हे घरातीलच व्यक्तीकडून किंवा शेजारी, विश्वासाच्या व्यक्तीकडून होऊ शकते त्यासाठी घर अगोदर सुरक्षित करा . भारत सरकार  "साक्षी " ट्रस्टद्वारे  राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवका मार्फत समाजामध्ये बाललैंगिक शोषण होत असेल आणि ते होऊ नये याबद्दल जनजागृती करण्याचे काम करते .बालकामध्ये लैंगिक शिक्षण देणे गरजेचे आहे.बालिकांचे संरक्षण करणे आणि त्यांचे शिक्षण पूर्ण करून घेणे तसेच त्यांना समाजामध्ये वावरत असताना स्वतः विषयी जागरूक करणे  . मानसिक मोनोबल वाढवणे  ही सर्व पालकांची जबाबदारी आहे, असे मत

 प्रमुख वक्ते डॉ.भारती गोमसे यांनी मार्गदर्शन करते वेळेस मांडले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के राजकुमार तसेच उपप्राचार्य डॉ संजय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील वेबिणार चे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारला महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी प्राध्यापक वृंद व कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला. रा .से  यो.कार्यक्रमाधिकारी  डॉ. पुष्पा गंगासागर यांनी वेबिनार चे प्रास्ताविक केले तर डॉ.अजय कुर्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या