💥मानवी जीवनातील सर्व समस्यांवरील योग्य उपाय श्रीमद् भागवत ग्रंथात.....!


💥स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांचे प्रतिपादन💥

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर (दि.९ डिसेंबर) : मानवी जीवनातील सर्व समस्यांवरील योग्य उपाय श्रीमद् भागवत ग्रंथात सांगितला आहे. मूळात या ग्रंथाचा उद्देशच मूळी मानव कल्याण आहे. हा ग्रंथ जीवन जगण्याची कला शिकविणारा तर आहेच परंतु, अंतीम सत्य असणार्‍या मृत्यूला कसे सामोरे जावे, हेही या ग्रंथाने शिकविले आहे. मृत्यूची भिती घालविणारा हा अप्रतिम ग्रंथ भारतीयांची बौध्दीक संपदा असून श्रीमद् भागवत ही प्रत्यक्ष भगवंताचीच वांङ्मय मूर्ती आहे, असे मत अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी न्यास ट्रस्टचे कोषाध्यक्ष आणि मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी न्यास ट्रस्टचे उपाध्यक्ष आचार्य गोविंद देव गिरीजी महाराज यांनी जिंतूर येथील कार्यक्रमात व्यक्त केले.

                      जिंतूर शहरातील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात कोकडवार परिवाराच्या वतीने श्रीमद् भागवत कथा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवारी भव्य शोभायात्रेने या ज्ञानयज्ञ सोहळ्यास सुरुवात झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी पहिल्या दिवशीच्या या भागवत कथेत श्रीमद् भागवत ग्रंथाचे सुंदर असे विवेचन केले. विशेषतः हा ग्रंथ मानवी जीवनास समर्पीत आहे, असे नमूद केले. हा ग्रंथ पूर्णतः मानवी कल्याणास समर्पित आहे, असे नमूद करीत जीवन जगण्याची कला या ग्रंथानेच मानवाला शिकविली आहे. त्यामुळेच या ग्रंथाचे वाचन, पारायण, प्रत्येकाने केले पाहिजे. श्रीमद् भागवत कथेचे श्रवण करीत प्रत्येकाने आपली वाटचाल केली पाहिजे. असे ते म्हणाले.

                    दरम्यान, 9 ते 15 डिसेंबर पर्यंत चालणार्‍या या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजक मुकूंद कोकडवार, संजय कोकडवार, मयुर मुकूंद कोकडवार, मंदार कोकडवार, प्रणव कोकडवार, यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या