💥शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी...!


 💥पूर्णा येथील शिक्षक बांधवांनी तहसीलदारांना दिले निवेदन💥

पूर्णेतील शिक्षक बांधवांतर्फे तहसीलदार,पूर्णा यांना दिनांक 01 नोव्हेंबर 2005पुर्वी नियुक्ती असलेल्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय समिती च्यावतीने एक निवेदन देण्यात आले. यावेळी उमाशंकर मिटकरी,बाबा सोनटक्के, राजू कापसे, दामाजी काळे, गणपत वाघमारे, गंगाधर साखरे, बालाजी डाखोरे,शेख ईब्राहिम, आफुने सर, स्वामी सर आदींसह अनेक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या