💥कुणाच्या घरात गर्भवती महिला,तर कुणाच्या घरात आजारी वृद्ध तरी देखील प्रशासनाने घरावर चालवला बुल्डोजर....!


💥पोलिसांचे पाय धरत महिलेचा काळीज पिळून टाकणारा आक्रोश💥


✍🏻शिवशंकर निरगुडे : हिंगोली

हिंगोली - काही घरात वृद्ध तर काही घरात बाळंतीण,गर्भवती महिला असताना कुठलीही पर्यायी व्यवस्था न करता हिंगोलीत तब्बल १९५ घरावर जेसीबी चालवला आहे.पर्यायी व्यवस्था न केल्याने हे कुटुंब वाऱ्यावर आले असून,घरावर जेसीबी चालत असताना एका महिलेने पोलिसांचे पाय धरत स्वतःच्याच डोक्यात दगड मारून काळीज पिळून टाकणारा आक्रोश केला आहे.परंतु प्रशासनाला दया न येता त्यांनी या लोकांच्या घरावर बुलडोझर चालवला.हिंगोली शहरातील तलाब कट्टा परिसरातील सत्तर वर्षापासून वास्तविक करणारी नागरिक आज अतिक्रमणाची शिकार बनले आहेत.स्वतःच्या स्वप्नातली बांधली घर डोळ्यादेखत काही क्षणात उध्वस्त झाली आहे.


अतिक्रमणादरम्यान मात्र एकाही आमदारांनी पुढाकार न घेतल्याची दिसून आले.त्याचबरोबर स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते व पदाधिकारी कुठल्याच पक्षाची दिसून आले नाही.फक्त उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विनायक भिसे पाटील यांनी अतिक्रमण काढणीस विरोध केल्यामुळे त्यांना अटक करून नजर कैदेत ठेवण्यात आले आहे.खरंतर या अतिक्रमण धारकांना इतर ठिकाणी पक्की घरे देऊन अतिक्रमण हटवणे गरजेचे होते परंतु तसे न झाल्यामुळे सध्या प्रशासनाबाबत तीव्र रोज व्यक्त केला जात आहे.


आज सकाळी अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढून घेण्यासाठी दोन तासाची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर सकाळी नऊ वाजल्यापासून पालिकेकडून प्रत्यक्षात अतिक्रमण हटविल्यास सुरुवात करण्यात आली. तीन जेसीबी मशीन, दहा ट्रॅक्टर च्या मदतीने अतिक्रमण काढून साहित्य जप्त केले जात होते.तर काही अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली होती.


हिंगोली शहरातील जलेश्वर तलावाच्या परिसरात असलेले 195 अतिक्रमण हटविण्यास आज सुरुवात झाली.यावेळी प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यातआला,अतिक्रमण काढण्यास विरोध करणार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विनायक भिसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हिंगोली शहरातील जलेश्वर तलावाच्या परिसरात 195 अतिक्रमणधारकांना महसूल प्रशासनाने नोटीस दिल्या होत्या त्यानंतर आज सकाळी अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी,तहसीलदार नवनाथ वागवाड, पोलिस उपाधीक्षक विवेकानंद वाखारे, रविवारी पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलाआहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या