💥परभणीतील छत्रपती शिवरायांच्या पुतळा परिसरातील मैदान हे उपोषण स्थळ की पार्किंग मैदान ? संभाजी सेनेचा सवाल...!


💥29 डिसेंबर 2022 पर्यत येथील वाहने काढण्यात आली नाहीत तर संभाजी सेना करणार हवा छोडो आंदोलन💥

परभणी येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळा परिसरातील मैदान हे उपोषण स्थळ की पार्किंग मैदान ? प्रशासनाला असा खडा सवाल उपस्थित करून संभाजी सेनेने प्रशासनाला हवा छोडो आंदोलनाचा इशारा दिला असून गुरुवार दि.29 डिसेंबर 2022 पर्यंत या परिसरातील वाहने प्रशासना कडून काढण्यात आली नाहीत तर तेथील वाहनांची संभाजी सेनेच्या वतीने हवा सोडण्यात येईल. असा इशारा संभाजी सेनेचे शहराध्यक्ष अरून पवार यांनी दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील उपोषण स्थळावर अनेक पार्किंग साठी येणाऱ्या वाहनांची सारखी वर्दळ दिसून येत आहे, काही ड्रायव्हर वेगात गाड्या आणून पार्किंग करत आहेत,प्रशासनाने त्यावर तात्काळ आळा घालावा अन्यथा जाहीर करून टाकावे की या उपोषण स्थळावर एखाद्या उपोषणकर्त्यावर किंवा त्यास भेटायला आलेल्या व्यक्तीवर त्यात काही घातपात अथवा जीवित हानी झाली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासनाने घेण्याचे जाहीर करावे अन्यथा तात्काळ बेकायदेशीरपणे असणारी पार्किंग मैदानाच्या बाहेर करावी या पोस्टची दखल प्रशासनाने न घेतल्यास दिनांक 29 डिसेंबर रोजी मैदानात असणाऱ्या सर्व गाड्यांची हवा छोडो आंदोलन करण्यात येणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकाद्वारे संभाजी सेना शहराध्यक्ष अरुन पवार यांनी म्हटले असून या नंतर काही अनुचित प्रकार घडला तर याची सर्व जवाबदारी ही प्रशासनाची राहील असेही म्हटले आहे......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या