💥कमी पटसंख्येच्या शाळांवर होणार कंत्राटी शिक्षकांची भरती ? शिक्षण विभागाकडून तयारी सुरु....!


💥कमी पटाच्या शाळांवर कंत्राटी व सेवानिवृत्त शिक्षकांची भरती केली जाणार💥 

✍️ मोहन चौकेकर 

 जिल्हा परिषदेच्या कमी पटसंख्येच्या शाळा बंद न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे समजते. मात्र, या शाळांमधील सुमारे साडेतीन हजार शिक्षकांना दुसऱ्या शाळेत हलवले जाईल व कमी पटाच्या शाळांवर कंत्राटी व सेवानिवृत्त शिक्षकांची भरती केली जाणार आहे.

शिक्षण आयुक्त सूरज मांढरे म्हणाले, की ‘‘एकाच गावात कमी पटसंख्येच्या दोन सरकारी शाळा असल्यास, त्यांचे समायोजन केले जाईल. मात्र, दुर्गम भागातील कमी पटसंख्येच्या, अन्य पर्याय उपलब्ध नसलेल्या शाळा बंद केल्या जाणार नाहीत.."

*‘या’ शाळा बंद होणार ? :-

▪️ सलग तीन वर्षे पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न होऊनही विद्यार्थी वाढले नाहीत.

▪️ पटसंख्या वाढीसाठी सतत प्रयत्न झाले, पण विद्यार्थी संख्या घटली.

▪️ 12-14 विद्यार्थी व तीन शिक्षक असणाऱ्या शाळा.

▪️ जिल्हा परिषद शाळेपासून एक किलोमीटरमधील अनुदानित शाळा.

 *राज्यातील शाळांची सद्यस्थिती*

▪️ एकूण शाळा - 60,912

▪️ विद्यार्थी संख्या-  43.56 लाख

▪️ कमी पटसंख्येच्या शाळा - 4790

▪️ संभाव्य कंत्राटी शिक्षक भरती - 5000                                                                   

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या