💥परभणी जिल्ह्यात सर्वत्र एनएमएमएस परीक्षा सुरळीत.....!


[सेलू: एनएमएमएस परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रांना भेटी देतांना येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयात तयार करण्यात आलेल्या परसबागेला गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत यांनी भेट दिली.यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे,मुख्याध्यापक प्रदीप कौसडीकर,मुख्याध्यापक सुभाष नावकर आधी]

💥शिक्षण विभागाने काटेकोर नियोजन केल्याने जिल्हाभरात परीक्षा सुरळीत पार पडल्या💥

परभणी (दि.23 डिसेंबर) - जिल्ह्यात राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी (एनएमएमएस )21 डिसेंबर रोजी ही परीक्षा सुरळीत पार पडली.जिल्ह्यात एकूण 18 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली तर 4939 विद्यार्थ्यांची या परीक्षेला उपस्थिती होती.परीक्षेसाठी जिल्हास्तरावर वेगवेगळी 4 पथक स्थापन करण्यात आली होती.तसेच प्रत्येक तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांचेही फिरते पथक स्थापन करण्यात आले होते.

प्रत्येक परीक्षा केंद्रावर स्वतंत्र बैठे पथक सुद्धा होते.यामुळे शिक्षण विभागाने काटेकोर नियोजन केल्याने जिल्हाभरात परीक्षा सुरळीत पार पडल्या.सेलू येथे गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत,शिक्षणविस्तार अधिकारी गजानन वाघमारे यांनी परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली.माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड,प्रभारी उपशिक्षणाधिकारी गणराज येरमळ,विस्तार अधिकारी गोविंद मोरे,मुख्याध्यापक दयानंद जमशेट्ये,सहायक योजना अधिकारी बालासाहेब मुंडे यांच्यासह इतर अधिकारी,मुख्याध्यापक परीक्षेसाठी दक्ष होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या