💥जिंतूर तालुक्यातील इटोली येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यासह सरपंचांची जिल्हा परिषद शाळेस सदिच्छा भेट...!


💥शाळेसाठी ग्रामपंचायत कडून योग्य ती मदत व सहकार्य करणार असल्याचे सरपंच जगदीश घुगे यांनी सांगितले💥

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी. रामपूरकर

जिंतूर तालुक्यातील इटोली येथील ग्रामपंचायत सदस्यासह सरपंचांनी जिल्हा परिषद केंद्रीय शाळेस आज दिनांक 30 /12/ 2022 रोजी सदिच्छा भेट दिली.त्यावेळी उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांची भेट घेतली व शाळेसाठी ग्रामपंचायत कडून योग्य ती मदत व सहकार्य करणार असल्याचे सरपंच जगदीश घुगे यांनी सांगितले.

यावेळी मुख्याध्यापक श्री जुमडे सर सहशिक्षक चव्हाण बी.टी.,  मेनकुदळे पी. व्ही., काळे जी.डी. श्रीमती नागरगोजे के. डी., एम एस दाडगे आदी शिक्षकांसह ग्रामशिक्षण समिती अध्यक्ष नवनाथ मेन कुदळे तथा ग्रामपंचायत सदस्य भगवान घुगे, दत्ता समरतकर, मनोहर कोद्रे ,परमेश्वर स्वामी सर आदी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या