💥पुर्णा तालुक्यातील माखणी येथील प्रगतसिल शेतकरी जनार्धन आवगंड यांनी केली बायोगॅसची निर्मिती....!


💥शेतकरी आवगंड यांच्या बायोगॅसची परीवहन उपप्रबंधक श्रीकृष्ण नखाते व इतर मान्यवरांनी केली पाहणी💥

पुर्णा (दि.१५ डिसेंबर) - फळबागाची कटई योग्य पध्दतीने केली की उत्पादनात कमालीची वाढ होते. शेती करण्याची आवड जिल्ह्यात अनेक शेतकरी बांधवांना आहे मात्र आधुनिकीकरण व सेंद्रिय खताचा वापर, पिकाची निगा मार्गदर्शन शिबीर वाढवने गरजेचे असे विचार परभणी जिल्ह्याचे आर टी ओ श्रीकृष्ण नखाते यांनी मांडले. 


      आधिकारी शेतकरी यांच्या बांधावर क्षेत्रभेट उपक्रम सोमवार (ता . १२) रोजी घेण्यात आला . मार्गदर्शन शिबिरात प्रसंगी पशु शक्ती चा योग्य वापर आधिकारी स्मिता सोळंकी , जिल्हा कृषी आधिकारी विजय लोखंडे , उपविभागीय आधिकारी नित्यानंद काळे , प्रभाकर बनसोडे , शेंदिय शेती शास्त्रज्ञ आनंद गोरे , अमित तुपे , गजानन गडदे , तालुका कृषिआधिकारी रामचंद्र तांबिले ,श्रीमती जी. डब्ल्य. रनेर ,निलेश आडसुळे ,प्रविण काळे , सुरेश काळे , प्रशांत ढोके ,कैलास गायकवाड आदीची उपस्थिती होती . जिल्यातील शेतकरी बांधवांना वेळोवेळी बांधवार मार्गदर्शन करण्यासाठी आधिकारी कर्मचारी येतात त्यामुळे शेती प्रगत होत आहे .

            जिल्ह्यातील १० प्रगतसिल  शेतकरी बांधवांच्या शेतीला क्षेत्र भेटी घेतल्यानंतर मार्गदर्शन करतांना आर. टी .ओ .उपप्रबंधक श्रीकृष्ण नखाते बोलत होते . कार्यक्रमास  पंडीत थोरात , रमेश राऊत , बाबासाहेब घाटोळ , नामदेव कोक्कर ,जनार्धन आवरगंड , प्रकाश हरकळ , रामेश्वर साबळे ,संभाजी गायकवाड , सुदाम माने , रमेश चौधरी यांच्या शेतात राजगिरा , भाजीपाला, ग्रिनहाउस , राजमा ,बायोगॅस, सिताफळ , पेरु , आंबा ,गिर गाय पालन , मिरची ,खरबुज ,ओवा , बीट,कारले , तुर अदी विविध उपक्रमात स्पर्धात्मक शेती उत्पादन पिकवनारे शेतकरी यांना मार्गदर्शन शिबिरे ठेवुन जिल्ह्यातील शेतकरी सशक्त बनला पाहीजे यासाठी गरज पडेल त्या शेतकरी राजाच्या हाकेला ओ देत आधिकारी उपस्थित असतात असे मनोगत पंडित थोरात यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार  आत्माच्या श्रीमती स्वाती घोडके यांनी मानले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या