💥पुर्णेत बिना परवाना चालणाऱ्या स्टोन क्रेशर खदानपट्टा धारकांनी बुडवला शासनाचा कोट्यावधीचा रुपयांचा महसुल...!


💥स्टोन क्रेशन धारकांनी खानपट्यातून प्रचंड प्रमाणात उत्खनन करीत शासकीय गुत्तेदारांना केला कोट्यावधी रुपयांच्या गिट्टीचा पुरवठा💥 

परभणी/पुर्णा (दि.१९ डिसेंबर) - परभणी जिल्हा महसुल व गौण खनिज विभागाच्या दफ्तरी काही बंद तर काही परवान्याची मुद्दत संपल्याची नोंद असलेल्या परंतु स्थानिक तहसिलदार व महसुल प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कृपादृष्टीने राजरोसपणे आपला कारभार चालवत प्रचंड प्रमाणात बेकायदेशीर नियमबाह्य पध्दतीने उत्खनन करीत शासनाचा प्रत्येक महिन्याला लाखों रुपयांचा महसुल तसेच इन्कम टेक्स/सेलटेक्स/जिएसटी बुडवून खुलेआम चोरट्या गौण-खनिज गिट्टी/मुरुम/मातीची असंख्य हायवा/टिप्पर द्वारे तालुक्यातील शासकीय विकास कामांचे गुत्तेदारांना पुरवठा करणाऱ्यांच्या विरोधात प्रसार माध्यमांनी बातम्या प्रसिध्द करण्यास सुरुवात करुन जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधताच पुर्णा तालुक्यातील १३ बेकायदेशीर स्टोन क्रेशर खानपट्टा धारकांवर स्थानिक तहसिलदार पल्लवी टेमकर व महसुल प्रशासनाचे नायब तहसिलदार नितेशकुमार बोलेलू यांच्या आदेशाने दि.१६ डिसेंबर २०२२ रोजी संबंधित भागातील मंडळ अधिकारी तलाठी यांनी कारवाई करीत अवैधरित्या चालणाऱ्या स्टोन क्रेशरांना' सिल ठोकण्याचे कारवाई नाट्य सोईस्कररित्या रंगवले खरे मात्र मागील अंदाजे वर्षभरापासून संबंधित स्टोन क्रेशर खानपट्टा धारक आपला गैरकारभार खुलेआम चालवत कोट्यावधी रुपयांच्या गौण-खनिजाचे उत्खनन करीत त्याच चोरट्या गौण-खनिजाची शासकीय गुत्तेदारांना लेखी स्वरुपात करार करून विक्री करीत असतांना स्थानिक महसुल प्रशासन आपले कर्तव्य विसरून झोपले होते की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

परभणी जिल्हा महसुल व गौण खनिज विभागात अक्षरशः बंद असल्याची नोंद असलेल्या पुर्णा तालुक्यातील कानखेड,आडगाव (ला.),गौर,हिवरा (बु.) या पाच स्टोन क्रेशर खानपट्टा धारकां पैकी कानखेड येथील स्टोन क्रेशर खानपट्टा धारक शांतिलाल मुथा स्वतः शासकीय गुत्तेदार असल्यामुळे या खानपट्यातील चोरट्या गौण खनिज गिट्टीचा वापर शासकीय विकास कामांवर होत नसेल हे कशावरून याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे पुर्णा तालुक्यातील पुर्णा-नांदेड राज्य महामार्गावरील नांदेड-हिंगोली लोहमार्गावर बांधण्यात येत असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या रेल्वे उड्डाण पुलाला देखील चोरट्या गौण-खनिज गिट्टी/दगडाचा पुरवठा आडगाव (ला.) येथील जिल्हा महसुल गौण-खनिज विभागाच्या दफ्तरी बंद असल्याची नोंद असलेल्या स्टोन क्रेशर खानपट्टा धारकाकडून लेखी करार करून पुरवठा होत असल्याचे दस्तूर खुद्द संबंधित गुत्तेदाराकडून समजते अश्याच प्रकारे तालुक्यातील वजूर येथील निर्माणाधीन पुल,धानोरा काळे येथील पुल,धनगर टाकळी येथील दोन पुलांना देखील कोट्यावधी रुपयांच्या चोरट्या गौण-खनिज गिट्टी/दगड आदींचा पुरवठा होत असतांना महसुल प्रशासनाची अद्यापर्यंत या गैरकारभाराला संमती होती की काय ? असा प्रश्न उपस्थित होत असून स्थानिक महसुल प्रशासनाने संबंधित बिना परवाना चालणाऱ्या 'स्टोन क्रेशर खानपट्टा' चालकांवर कारवाईचे नाट्य रंगवून सिल ठोकल्याचा कांगावा केला खरा परंतु संबंधित खानपट्या झालेल्या प्रचंड प्रमाणातील उत्खननाची भुमी अभिलेख विभागा मार्फत ईटीएस मोजनी करून संबंधित स्टोन क्रेशर खानपट्टा धारकांवर दंडात्मक कारवाई होणार की केवळ कारवाई नाट्यच रंगवले जाणार ? असा प्रश्न उपस्थित होत असून जिल्ह्याच्या सन्माननीय जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी स्वतः या प्रकरणाकडे लक्ष देऊन या गैरकारभाराला जवाबदार असलेल्या तहसिलदार महसुल प्रशासनातील अधिकारी तसेच संबंधित भागातील तलाठी,मंडळ अधिकारी,ग्रामसेवक यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जनसामान्यांतून होत आहे.......

  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या