💥राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष मा.केंद्रीय मंत्री शरद पवार यांना फोनवर जिवे मारण्याची धमकी....!💥जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीची ओळख पटली💥

 ✍️ मोहन चौकेकर 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. शरद पवार यांच्या मुंबईतील 'सिल्वर ओक' या निवासस्थानी 2 डिसेंबर रोजी फोन करुन ही धमकी देण्यात आली होती.

* आरोपी बिहारचा ? :-

आरोपीने मुंबईत येऊन देशी कट्ट्याने शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली. ही व्यक्ती हिंदी बोलत होती. 'सिल्वर ओक'वरील टेलिफोन ऑपरेटर पोलिस कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरुन ग्रामदेवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत, फोन लोकेशन ट्रेस केलं असता, धमकी देणारी व्यक्ती बिहारची असून, त्याने यापूर्वीही एकदा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्या प्रकरणात त्याला ताब्यातही घेतलं होतं.

* भाजप नेते प्रसाद लाड यांना देखील धमकी :-

भाजप नेते प्रसाद लाड यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. लाड यांचे पुतणे वरुण लाड यांच्या फोनवर अज्ञात व्यक्तीने फोन करून प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या