💥मध्यप्रदेशमधील जबलपूरच्या दमोह येथे बस चालकाचा हार्ट ॲटेक मुळे जागेवरच मृत्त्यू,बसने रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांना चिरडले.....!


💥धक्कादायक : तब्बल ५० प्रवाश्यांना घेऊन चाललेल्या बस चालकाला आला ॲटक💥

नवी दिल्ली – तब्बल ५० प्रवाश्यांना घेऊन जाणाऱ्या बस चालकाला अचानक हार्ट ॲटक आल्याने प्रवाश्यांच्या काळजाचा ठोका चुकला चालत्या बसमध्येच ॲटक आल्याने ड्रायव्हर जागीच मृत्यू झाला त्यासोबतच बस दिशाहीन झाल्याने रस्त्यांवरून चाललेल्या इतर वाहनांना बसने अक्षरशः चिरडले. 

या दुर्दैवी अपघाताचा सी.सी.टी.व्ही. देखील आता समोर आला आहे मध्यप्रदेशमधील जबलपूरच्या दमोह नाका या ठिकाणी ही घटना घडली या ठिकाणी अचानक प्रवासी बस अनियंत्रित झाल्याने एकच खळबळ उडाली नियंत्रण सुटलेल्या बसने रस्त्यावरील तब्बल ६ वाहन धारकांना चिरडले यामध्ये ई रिक्षा,ऑटो रिक्षा आणि काही दुचाकी स्वारांचा समावेश आहे या घटनेचा व्हि.डी.ओ. समोर येताच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हा अपघात होताच ड्राइव्हर दारू प्यायलेला असल्यामुळे त्याने अनेक वाहनांना उडवले अशी शंका सुरुवातीला रस्त्यावरील इतरांना आली परंतु नंतर बसकडे धाव घेत अनेकांनी ड्रायव्हरचे केबिन पाहिले असता त्यांना चालक बेशुद्ध अवस्थेत आढळला. चालकाला रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त प्रसारित केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या