💥वृक्ष लागवडीसाठी प्रत्येकाने स्वताहून पुढे आले पाहीजे - सिने अभिनेते सयाजी शिंदे


💥सह्याद्री देवराई टोकाई गडावर वृक्षजागर मेळाव्यात बोलतांना सिने अभिनेते शिंदे यांनी केले प्रतिपादन💥 


शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील सह्याद्री देवराई टोकाईगडावर शुक्रवारी दि 09/12/2022 रोजी  वृक्ष जागर सोहळा झाला. देवराईचे संस्थापक सिनेअभिनेते सयाजी शिंदे, दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री कल्पना सैनी व जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.


         महाराष्ट्रातील नष्ट झालेल्या देवराया पुन्हा नव्याने उभारण्याचे काम सह्याद्री देवराई या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जवळपास ४० ठिकाणी सुरू आहे. त्यातीलच कुरुंदा येथीलटोकाईगडावरील गेल्या चार वर्षांपासून वृक्षलागवड आणि वृक्षसंगोपनाचे काम सह्याद्री देवराई टोकाईगड परिवाराच्या अविरतपणे करत आहे. या पार्श्वभूमीवर टोकाईगडाला भेट देण्यासाठी व वृक्षप्रेमींशी संवाद साधण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सह्याद्रीचे सचिन चंदने, स्मिता जगताप, तहसीलदार अरविंद बोळंगे, मुंजाजीराव इंगोले, रामदास पवार आदींची उपस्थिती होती. सयाजी शिंदे म्हणाले, "वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे." कार्यक्रमासाठी सह्याद्री देवरा ईटोकाईगड फाउंडेशनचे मंगेश दळवी,मंगेश इंगोले, ॲड. वैभव जाधव, किशोर फेदराम, कृष्णा बागल, नितीन इंगोले, गजानन फुलारी, गजेंद्र येल्हारे, गणेश वटमे, मंगेश देशमुख, प्रल्हाद शिंदे, बबनराव इंगोले, संजीवकुमार बेंडके आदींनी पुढाकार घेतला होता. प्रा. नामदेव दळवी यांनी सूत्रसंचालन केले.


* देवराई म्हणजे काय ?

देवराई हा जंगलाचा समृद्ध असा भाग किंवा वेगळे असे एक जंगल होय. देवराई नावाचा अर्थदेवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन. सहसा, अशीअरण्ये सरकारच्या वनखात्याने सांभाळलेली नसून परंपरेने समाजाने सांभाळलेली असतात. अशा वनांना अनेकदा शरणवन, अभयारण्य किंवा अभयस्थान असेही म्हटले जाते. देवराया जशा भारतभर विखुरलेल्या आहेत तशा त्या भारताबाहेरही आहेत. काही भागांत देवरायांना 'चर्च फॉरेस्ट' असेही म्हटले जाते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या