💥पुर्णेतील श्री.गुरू बुद्धीस्वामी महाविद्यायातील खेळाडूंची विभागीय स्तरावर निवड....!


💥सर्व विद्यार्थिनी औरंगाबाद येथील विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्र झालेले आहेत💥

पूर्णा (दि.13 डिसेंबर) - क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद परभणी व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा 2022 मधील मैदानी स्पर्धा (अथलेटिक्स) स्पर्धामध्ये श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालय पूर्णा येथील विद्यार्थिनी तेजस्विनी नामदेव पारवे (11 कला) 1500m द्वितीय, 3000m द्वितीय,किरण ज्ञानोबा ढोणे (11 कला)200m द्वितीय,परमिता गंगाधर सूर्यवंशी (11 विज्ञान)लांब उडी द्वितीय हे सर्व विद्यार्थिनी औरंगाबाद येथील विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्र झालेले आहे. 

श्री गुरुबुद्धी स्वामी शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष श्री प्रमोद एकलारे, सचिव श्री अमृतराज कदम, सहसचिव प्रा. गोविंद कदम, कोषाध्यक्ष श्री उत्तमरावजी कदम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ के. राजकुमार, उपप्राचार्य डॉ संजय दळवी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षक श्री अनुशाल्व शेजुळ, पर्यवेक्षक श्री उमाशंकर मिटकरी, कार्यालयीन अधीक्षक श्री अरुण डुब्बेवार तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थिनीचे अभिनंदन केले. क्रीडा शिक्षक श्री सतीश बरकुंटे यांचे सर्व विद्यार्थीनींना मुलाचे मार्गदर्शन लाभले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या