💥अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहावे : जिल्हाधिकारी आंचल गोयल


◆जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा◆


परभणी (दि.18 डिसेंबर) : अल्पसंख्याक समाजाने आपल्या हक्क आणि अधिकारांबाबत जागरूक राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी  आंचल गोयल यांनी केले. अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्याचे अल्पसंख्याक आयोगाच्या निर्देशानुसार येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात अल्पसंख्याक हक्क दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी गोयल बोलत होत्या यावेळी डॉ. सलीम मद्दीनोद्दीन,प्रा.संजय जाधव,डॉ.वर्षा सेलसुरीकर,जिप महिला बाल विकास विभागाचे उप मुख्याधिकारी विशाल जाधव,श्रीमती दाभाडे, अग्रणी बँकेचे श्री हट्टेकर यांची उपस्थिती होती.


यावेळी जिल्हाधिकारी गोयल म्हणाल्या की, अल्पसंख्यांक समाजातील युवकांनी स्वयं:प्रकाशीत होणे गरजेचे आहे. भावी पिढी घडविण्यासाठी संघटनेच्या सर्व सदस्यांनी कार्यरत रहावे. समाजासाठी अधिक संधी उपलब्ध करुन देण्यासाठी अधिकार्‍यांनी कार्यरत रहावे. अल्पसंख्याक समुदयासाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनाची माहिती सर्वांपर्यत पोहचणे आवश्यक आहे. तसेच या योजनांचा लाभ सर्व अल्पसंख्याक समुदयाला मिळाला पाहिजे. आजच्या स्पर्धेच्या प्रवाहात अल्पसंख्याक व्यक्ती टिकुन राहावा यासाठी मराठी भाषेचे शिक्षण देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे.  विद्यार्थ्यांना शासनाने  नेमुन दिलेले इतरही आवश्यक ते शिक्षण देणे आवश्यक आहे जेणेकरून शिक्षण घेतलेला कोणताही विद्यार्थी  या स्पर्धेच्या बाहेरील वातावरणात टिकला पाहिजे.


धर्म व भाषा यावर आधारीत अल्पसंख्याक समाज आहे. धर्म व भाषेनुसार यात भेदाभेद न करता सर्वांनी एकसंघ होवून कार्यरत राहावे. देशात अखंडीतता राखण्यासाठी  परंपरा , संस्कृती, भाषा व धर्म एका समुदायाने दुसऱ्या समुदायावर लादु नये.  घटना व कायादयानुसार प्रत्येकाला आपला हक्क दिलेला आहे. प्रत्येकाला  स्वातंत्र आहे असे प्रमुख वक्त्यांनी  वेगवेगळे उदाहरण देवून उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच अल्पसंख्याक नागरिकांचे संविधानात्मक हक्क व अधिकार याची माहिती दिली. शासनाच्या अल्पसंख्याकांसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. 

अल्पसंख्याकांना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काबाबत जाणीव करून देण्यासाठी या दिनाचे आयोजन करण्यात येते यावेळी मान्यवरांच्या हस्ते रांगोळी, वक्तृत्व, निबंध, भित्ति पत्रिका स्पर्धेतील विजेत्याना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी अल्पसंख्याक समाजातील नागरिक आणि प्रशासनातील अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या