💥परभणी तालुक्यातील नांदापूर येथिल दोन अल्पवयीन मुली बेपत्ता...!


💥बेपत्ता झालेल्या दोन्ही मुली परभणीतील एका महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिकत होत्या💥

परभणी (दि.१५ डिसेंबर) : तालुक्यातील नांदापूर येथील दोन अल्पवयीन मुली १२ डिसेंबर २०२२ पासून बेपत्ता झाल्या आहेत या दोन्ही मुली परभणीतील एका महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिकत होत्या.

 त्या दररोज येण जाण करीत होत्या दि.१२ डिसेंबर २०२२ रोजी त्या परभणीत दाखल झाल्या खऱ्या परंतु दुपारी उशीरापर्यंत त्या गावी परतल्या नाहीत. त्यामुळे कुटूंबियांनी तातडीने नातेवाईकांसह मैत्रीणी व संबंधित महाविद्यालयाकडे विचारपूस केली तेव्हा सकाळी ११-०० वाजेनंतरच त्या मुली महाविद्यालयातून बाहेर पडल्या, अशी माहिती कळाली. कुटूंबियांनी खूप शोधाशोध केली. अखेर कोतवाली पोलिस ठाणे गाठून या संदर्भात 23 डिसेेंबर रोजी तक्रार दाखल केली. कोतवाली पोलिसांनी या दोन्ही अल्पवयीन मुलींच्या शोधार्थ पथके रवाना केली आहेत.  दरम्यान, या दोन्ही अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले असावे, अशी शंका व्यक्त होत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या