💥एडिटर अँड प्रेस रिपोर्टर असोसिएशनच्या मराठवाडा अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर खंदारे यांची निवड.....!


💥पत्रकारावर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात एक संघपणे लढले पाहिजे - स.सो.खंडाळकर

 औरंगाबाद (दि.१४ डिसेंबर) - एडिटर अँड प्रेस रिपोर्टर असोसिएशनच्या मराठवाडा अध्यक्षपदी पत्रकार ज्ञानेश्वर खंदारे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. एडिटर अँड प्रेस रिपोर्टर असोसिएशनच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक ज्येष्ठ पत्रकार ससो खंडाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्रारंभी एडिटर अँड प्रेस रिपोर्टर असोसिएशनचे अध्यक्ष संपादक रतनकुमार साळवे, रशपालसिंग अट्टल यांनी संघटना स्थापनेचे ध्येय धोरण व्यक्त करून पत्रकारावर सध्या  अन्याय,अत्याचार,जुलूम,आणि हल्ले होत आहेत.

त्या विरोधात पत्रकारांनी संघटित होणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषण करताना स.सो.खंडाळकर म्हणाले की पत्रकार सध्या विखुरलेले आहेत एकसंघ नाहीत. पत्रकारांच्या ज्या संघटना आहेत त्या असून नसल्यासारख्या आहेत. अशा परिस्थितीत एडिटर अँड प्रेस रिपोर्टर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे.पत्रकारावर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात एक संघपणे लढले पाहिजे. ही काळाची गरज आहे असे ते म्हणाले. नवनिर्वाचित मराठवाडा अध्यक्ष पत्रकार ज्ञानेश्वर खंदारे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकाराने चिंतन, मनन, वाचन करून जळू परंतु धरणी उजळू या प्रमाणे आपण काम केले पाहिजे. क्रांतीच्या परिवर्तनाचा विचार आपण पुढे नेला पाहिजे. दलित, शोषित,कष्टकरी शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला एकसंघपणे वाचा फोडू. सर्व पत्रकारांनी संघटनेच्या नेतृत्वात एक होऊन पत्रकारितेच्या या लढ्यात मोठ्या ताकदीने उतरावे असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जेष्ठ पत्रकार गजानन बोदडे यांनी केले तर, आभार मनीष अग्रवाल यांनी मानले. याप्रसंगी संपादक रशपालसिंग अट्टल,संघटने चे संस्थापक सचिव  संजय सोनखेडे, उपाध्यक्ष बबन सोनवणे,भीमराव गाडेकर, गजानन बोदडे, मनीष अग्रवाल, फिरोजखान पठाण, प्रवीण बोरडे, राजाभाऊ उघडे,कल्याण देहाडे आदींची उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या