💥परभणी शहरातील दोन मुलीं हरवल्या प्रकरणातील माहिती देण्याचे आवाहन....!


💥नानलपेठ पोलिस स्थानकातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले💥

परभणी (दि.08 डिसेंबर) : परभणी शहरातील लंगोटे गल्ली आणि पोलीस वसाहत येथील प्रत्येकी एक अशा दोन मुलीं घरातून वेगवेगळी कारणे सांगून निघून गेल्या आहेत. त्यांच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीवरुन पोलीस शोध सुरु आहे. खालील वर्णनाच्या मुलीं कुणाला आढळुन आल्या त्यांनी पोलिस निरीक्षक, नानलपेठ पोलिस ठाणे, परभणी यांच्या संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

पोलीस वसाहत येथील पुष्पा परवरे यांच्या तक्रारीवरुन त्यांची बहिण सोनाली प्रकाश परवरे वय 22 वर्ष ही शिक्षण घेत असून ती रविवार, दि. 4 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 8 वाजेपासून त्यांच्या राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेली आहे. याप्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात मि.क्र.59/2022 प्रमाणे तक्रार दाखल करण्यात आली आहे. वर्णन रंग गोरा, चेहरा लांबट, उंची 5 फुट 5 इंच, बांधा सडपातळ, केस लांब व भुऱ्या रंगाचे असून ग्रे रंगाचा टॉप, काळ्या रंगाची लेगीन्स, काळे पांढरे ठिपके असलेला स्टॉल, पायामध्ये स्कीन कलरचा शुज घातलेला असून तिला मराठी व हिंदी भाषा अवगत आहेत.  या प्रकरणी कोणाला अशा वर्णनाची मुलगी आढळून आल्यास त्यांनी  पोलीस नाईक (मो. 8208992942)  यांच्याशी संपर्क साधावा.

तर दुसऱ्या प्रकरणात लंगोटे गल्ली, परभणी येथील शेख इब्राहिम शेख लाल यांच्या तक्रारीवरुन नाझमिन शेख इब्राहिम शेख वय 21 वर्ष ही शनिवार, दि. 26 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता शास्त्रीनगर येथून ब्युटी पार्लरच्या कामाला जात असल्याचे सांगून घरातून निघून गेली आहे. याप्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात मि.क्र. 57/2022 प्रमाणे तक्रार दाखल करण्यात आली आहे. वर्णन रंग सावळा, चेहरा लांबट, उंची 5 फुट 2 इंच, बांधा सडपातळ, अंगात काळ्या रंगाचा बुरखा व गुलाबी रंगाचा खमीज, काळसर रंगाचा सलवार, पायात चप्पल आणि सोबत मोबाईल आहे. या प्रकरणी कोणाला अशा वर्णनाची मुलगी आढळुन आल्यास त्यांनी पोलीस नाईक (मो. 9172729146) यांच्याशी संपर्क साधावा असे पोलीस निरीक्षक, नानलपेठ पोलिस ठाणे, परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या