💥पुर्णेत जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाची विशेष मोहिमे अंतर्गत अवैध गौण-खनिज उत्खनन स्थळावर धाड...!


💥विशेष पथकाने केलेल्या कारवाईत ०६ टिप्परांसह ०१ जेसीबी मशीनसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त💥

परभणी/पुर्णा (दि.२५ डिसेंबर) - तालुक्यात सर्वत्र गौण खनिज अर्थात मुरुम/माती/दगड/रेतीचे जेसीबी मशीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात अवैधरित्या उत्खनन करून या चोरट्या गौण खनिजाची टिप्पर द्वारे शासनाचा लाखो रुपयांचा महसुल बुडवून शासकीय गुत्तेदारांना विक्री केल्या जात असल्याची गंभीर बाब आज रविवार दि.२५ डिसेंबर २०२२ रोजी दुपारच्या सुमारास जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीमती रागसुधा आर.यांच्या विशेष पथकाने विशेष मोहिमे अंतर्गत तालुक्यातील पुर्णा-पांगरा ढोणे रोडवरील बरबडी शिवारातील अवैध मुरूम उत्खनन स्थळावर धाड टाकल्याने उघडकीस आली असून विशेष पथकाने केलेल्या या धाडसी कारवाईत तब्बल ०६ टिप्परसह अवैध उत्खननासाटी वापरण्यात येत असलेली ०१ जेसीबी मशीनसह लाखो रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्या विशेष पथकाने जप्त केलेले ०६ टिप्पर ०१ जेसीबी मशीन आदी मुद्देमाल पुढील कारवाई साठी पुर्णा पोलिसांच्या स्वाधीन केले असून जप्त केलेल्या ०६ टिप्परां पैकी एक टिप्पर अवैध उत्खनन केलेल्या चोरट्या मुरुमाने भरलेला आहे विशेष पथकाने अवैध उत्खनन स्थळावरून एम.एच - २२ ए.एम ५३१५ जेसीबी,एम.एच.०४ सि.यु -४१५३,एम.एच ०४ बि.जी-९३९०,एम.एच.०४ बि.यु-८३१५,एम.एच २९ टी-०३६४,या ०४ टिप्परांसह अन्य ०२ टिप्परांचा पाठलाग करून पांगरा रोडवरून ताब्यात घेतले असून या वाहनांकडे गौण खनिज वाहतुकीचे कुठलेही परवाने आढळून आले नसल्याचे पुर्णा पोलिस स्थानकाचे पो.नि.सुभाषचंद्र मारकड यांनी म्हटले आहे......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या