💥औरंगाबाद येथे नवीन रेल्वे डिविजन करण्याची मागणी.....!


💥मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने केली निवेदनाद्वारे मागणी💥

परभणी (दि.१० डिसेंबर) - मराठवाड्यातील जनतेवर रेल्वे प्रश्नी सतत अन्याय् होत असल्याने दमरे कडून कोणतीच मागणी पूर्ण करत नसल्याने मराठी माणसा करिता औरंगाबाद येथेच नवीन रेल्वे डिव्हिजन करावे अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने केली आहे  या बाबत दमरेच्या महाव्यवस्थापकाना दिलेल्या निवेदनात नमूंद केले आहे की नावालाच निर्माण करण्यात आलेल्या  नांदेड विभागात बहुसंख्येने कार्यरत तेलंगी अधिकार्यांनी नांदेड विभागाला त्यांच्या स्वतःच्या तेलांगण-आंध्रा कडील विभाग असें  वावरत केवळ तेलांगण-आंध्रा कडे जाणार्या गाड्यांची सोय सुविधा उपलब्ध करून देत आहेत. 

औरंगाबाद येथे किमान दोन पीट लाइन सुविधांची गरज असतांना सतत दुर्लक्ष होत आहे. विभागातील प्रवाशी पुणे, मुंबई, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर इत्यादी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रेल्वे गाड्यांची मागणी करत असतांना नागपूर, सोलापूर, गाड्यांना उलट बंद करून नांदेड येथील तेलुगु अधिकारी जनतेच्या विरोधात निर्णय घेत आहेत. मा. मंत्री दानवेसाहेब तर स्वतःला फक्त जालना शहर पूर्ते मंत्री समजून मराठवाडा विभागाला वीस वर्षे मागे नेऊन ठेवले आहे. मंत्री साहेबांनी जालना येथून रिकाम्या गाड्यांना चालविण्यासाठी आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी नांदेड येथून तेलंगणा-आंध्र राज्यात गाड्यांना चालविण्याचा सपाटा लावला आहे,हे लक्षात घेता संपूर्ण मराठवाडा विभागाला न्याय मिळण्यासाठी औरंगाबाद येथे नवीन रेल्वे डिविजन निर्माण करण्यात यावे अन्यथा नांदेड विभागाला मध्य रेल्वे विभागात जोडण्यात यावेत.    

दक्षिण-मध्य रेलवे विभागाने हैदराबाद, सिकंदराबाद, विजयवाडा, विशाखापट्टणम तिरुपति, निजामाबाद, अदिलाबाद सहीत सबंध तेलंगणा आणि आंध्रात सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून खूप पुढे नेतांना त्याच वेळी मराठवाड्याची राजधानी आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्द असलेल्या औरंगाबाद सहीत संपूर्ण मराठवाडा विभागाला प्रादेशिक भेदभावाने रेल्वे सारखे मूलभूत सुविधा न पुरविल्याने मराठवाड्याचा विकास खुंटीत राहिला आहे. त्यात आता सध्या कार्यरत असलेले महाव्यवस्थापक, महाप्रबंधक सहीत सर्व रेल्वे अधिकारी हम करे सो कायदा प्रमाणे स्वतःला देव समजून वावरत आहेत. अशा मगरूर अधिकार्यांच्या वागणुकीने नांदेड विभागाचे अपरिमित नुकसान होत चालले आहे.  विभागातील सर्व जलद गाड्यांना प्रत्येक स्थानकावर थांबा देतांना देखील एक्सप्रेसच्या प्रमाणे दुप्पट किराया वसूलण्यात येत आहे. कोरोना महामारीच्य पूर्वी चालविण्यात येत असलेल्या सर्व सवारी गाड्यांना बंद ठेऊन गोर गरीब, मध्यमवर्गीय आणि अप डाऊन करणार्या नोकरदार, मजदूर यांच्या समोर अनंत अडचणी निर्माण करण्यात आले आहेत. एकमेव पंढरपूर रेल्वे रात्रभर धावतांना देखील डेमू कोचेस जोडून वारकरी मंडळीवर मुद्दामहून अन्याय चालविले आहे. ह्या वरील सर्व कारणांसाठी औरंगाबाद येथे नवीन रेल्वे डिविजन निर्माण करण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाचे अरुण मेघराज, प्रा सुरेश नाईकवाडे, रितेश जैन, बाळासाहेब देशमुख, डाॅ राजगोपाल कालानी, श्रीकांत गडप्पा, रूस्तुम कदम, मंगलाताई मुदगलकर, रवींद्र मूथा, कादरीलाला हाशमी, प्रवीण थानवी, दयानंद दीक्षित इत्यादींनी केली आहे. 

* "जनरल मॅनेजर मुर्दाबाद" "दक्षिण-मध्य रेल्वे मुर्दाबाद" चा नारा :-

दिनांक 9 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता  परभणी रेल्वे स्थानकावर दक्षिण-मध्य रेल्वे विभागाचे महाव्यवस्थापक अरुणकुमार जैन वार्षिक तपासणीसाठी आले होते. मात्र त्यांना भेटून निवेदन देण्यासाठी उपस्थित रेल्वे संघटनेला न भेटताच त्यांनी पळवाट काढली. त्याने संतप्त झालेल्या संघटनेच्या पदाधिकार्यांनी "जनरल मॅनेजर मुर्दाबाद" दक्षिण-मध्य रेल्वे मुर्दाबाद" च्या घोषणा दिल्या. घोषणाबाजी बघून जनरल मॅनेजर साहेबांनी त्यांची विशेष रेल्वे थांबवून प्रवाशी संघटनेच्या पदाधिकार्यांसोबत चर्चा करून रेल्वे मागण्याचा निवेदन स्वीकारले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या