💥गोपाला फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष खराटे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना थंडीचे साहित्य वाटप....!


💥परभणी शहरातील माता रमाबाई आंबेडकर मुलांचे वस्तीगृह येथील विद्यार्थ्यांना थंडीचे साहित्य वाटप करण्यात आले💥

परभणी (दि.१० डिसेंबर) - शहरातील समाज हितासाठी सदैव सामाजिक कार्य करणारे गोपाला फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष खराटे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त  परभणी शहरातील माता रमाबाई आंबेडकर  मुलांचे वस्तीगृह येथील विद्यार्थ्यांना थंडीचे साहित्य वाटप केले.

      संतोष खराटे हे सामाजिक जाणीव ठेवून गोरगरीब लोकांना मदतीसाठी नेहमी अग्रेसर असतात त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आज दिनांक 9 डिसेंबर रोजी वाढदिवसानिमित्त  समाजहित अभियान  प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष  तथा माता रमाबाई आंबेडकर मुलांच्या वस्तीग्रहाचे सचिव प्रमोद अंभोरे  यांच्या अध्यक्षतेखाली 40 विद्यार्थ्यांना थंडी पासून संरक्षणासाठी  कानटोपीचे वाटप केले आहे. 

       याप्रसंगी संतोष खराटे यांचे माता रमाबाई आंबेडकर वस्तिगृहातील विद्यार्थ्यानी स्वागत करून वाढदिवसाच्या शुभैच्छा दिल्या या स्तुत्य उपक्रम प्रसंगी संतोष खराटे व प्रमुख पाहुने अँड गजानन मुस्तापुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद अंभोरे यांनी केले व  सुत्रसंचालन सिध्दांत सुर्यवंशी यांनी केले.

    याप्रसंगी वस्तिगृह कर्मचारी प्रकाश वडधुतीकर, प्रियंका अंभोरे, त्याच प्रमाणे  परमेश्वर गायकवाड, ज्ञानेश्वर बनसोडे, रेखा कांबळे, जयश्री निकाळजे व वस्तिगृहातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या