💥पुर्णा तालुक्यातील गौर येथील श्री.सोमेश्वर विद्यालयाचा विद्यार्थी भगवान सरोदेची राज्यस्तरीय शालेय क्रिडा स्पर्धेसाठी निवड...!


💥श्री.सोमेश्वर विद्यालयाच्या वतीने भगवान सरोदेसह सिआयएसएफ जवान माधव मळगण यांचा करण्यात आला सत्कार💥                

पुर्णा (दि.29 डिसेंबर) - तालुक्यातील गौर येथील श्री सोमेश्वर विद्यालयाचा विद्यार्थी भगवान शिवाजी सरोदे ह्याने काल बुधवार दि .28 डिसेंबर 2022 रोजी विभागीय क्रिडा संकुल औरंगाबाद येथे झालेल्या विभागीय शालेय क्रिडा स्पर्धेत 17 वर्षे वयोगटात 800 मिटर धावण्याच्या शर्यती मध्ये प्रथम क्रमांक पटकावला असून पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे .त्याच्या या यशाबद्दल त्याचे व त्याला मार्गदर्शन करणारे क्रिडा शिक्षक श्री.व्हि.आर.पारवे यांचे संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव राजभोज व सचिव रंगनाथराव पारवे,तसेच मुख्याध्यापक ए.एस.काळे यांनी त्याचा सत्कार करून  कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच या प्रसंगी माजी विद्यार्थी माधव मळगण याची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सिआयएसएफ) मध्ये निवड झाल्याबद्दल त्याचा देखील यावेळी संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या