💥काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यामुळे शिक्षकाला केले निलंबीत....!


💥निलंबीत राजेश कन्नोजे आदिवासी व्यवहार विभागांतर्गत कन्स्या येथील प्राथमिक शाळेत शिक्षक आहे💥

मध्य प्रदेशातील बरवानी जिल्ह्यात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्याबद्दल एका सरकारी शाळेतील शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे राजेश कन्नोजे असे या शिक्षकाचे नाव आहे ते राज्याच्या आदिवासी व्यवहार विभागांतर्गत कन्स्या येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक आहेत. कन्नोजे यांना सेवा आचार नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आणि राजकीय सभेला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

त्यांनी महत्त्वाच्या कामाचे कारण देत रजा मागितली होती परंतु प्रत्यक्षात ते भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आणि त्यांनी त्यांचे फोटो सोशल मिडीयावर टाकले होते त्यानुसार त्यांच्यावर ही कारवाई झाल्याचे आदिवासी व्यवहार विभागाचे सहाय्यक आयुक्त एन.एस. रघुवंशी यांनी सांगितले.या घटनेवर प्रतिक्रीया देताना प्रदेश कॉंग्रेसच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष के. के. मिश्रा यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे की, शिवराज सिंह चौहान सरकारने कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये भाग घेण्याची परवानगी दिली आहे,

 परंतु भारत जोडो यात्रेतील सहभागाबद्दल राजेश कन्नोजे या आदिवासीला निलंबित केले आहे. ही सरळसरळ दुटप्पी भूमिका आहे असे त्यांनी म्हटले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या