💥यशोगाथा हिंगोलीतील शेतकऱ्याच्या कष्टाला 'गोड फळ' सीताफळ फळबागेतून लाखोचे उत्पन्न...!


💥आत्माराम भूतेकर यांनी निसर्गाला पुरक असलेल्याच फळाची लागवड करण्याचे ठरवले अन् आज लाखोंमध्ये उत्पादन💥

 शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

सध्या निसर्गाच्या लहरीपनामुळे शेती करणे अवघड झाले आहे कधि अतिवृष्टी तर कधि कोरडा दुष्काळ या सर्व बाबी ला हताश न होता भूतेकर  यांनी भौगोलिक स्थितीचा अभ्यास करुन सिताफळ लागवडीवर भर दिला. निसर्गाला पुरक असलेल्याच फळाची लागवड करण्याचे ठरवले आणि आज लाखोंमध्ये उत्पादन देखिल  मिळत आहे.


हिंगोली  शेती व्यवसयात यशापेक्षा अपयश जास्त प्रमाणात दिसून येत आहे पण हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील केलसुला येथील  एका शेतकऱ्याने आपल्या दिड एकर शेतात 450 सिताफळाची झाडे लावली  त्यांनी भौगोलिक स्थितीचा अभ्यास करुन सिताफळ लागवडीवर भर दिला. निसर्गाला पुरक असलेल्याच फळाची लागवड करण्याचे ठरवले आणि आज लाखोंमध्ये उत्पादन मिळत आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील केलसूला येथील आत्माराम भूतेकर यांच्या कडे 30 एकर शेती व त्याना दोन मुले रवी भूतेकर व अमर भूतेकर हें दोन मुले आहेत  ते त्याच्या शेतात खरीपतील  सोयाबीन तूर कापूस हळद हें पिके घेतात मात्र आत्ता त्यांनी या पिकाला फाटा देत सिताफळ लागवड केली आहे व दिड एकर सिताफळ व अर्धा एकर लिंबोनीची झाडे लागवड केले आहेत त्याचा शेतात  60 बाय 80 चे मोठे शेततळे देखिल त्यांनी घेतले आहे जणे करून उन्हाळ्यात त्या पाण्याचा   उपयोग करता येतो 

हिंगोली जिल्ह्यतील केलसुला येथील आत्माराम भूतेकर यांचा शेती व्यवसयाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनातून अनेकांना प्रेरणा मिळेल असा त्यांचा प्रवास आहे. केवळ व्यवसाय म्हणून शेतामधीलच ज्ञान पुरेसे नाही तर बाजारभाव आणि काळानुरुप होणाऱ्या बदलाचाही त्यांनी अभ्यास केलेला आहे. त्यामुळेच त्यांनी सोयाबीन पिकाला फाटा देत सीताफळ लागवड केली आज त्याना चांगला नफा देखिल मिळत आहे 

* म्हणून केली सिताफळाची निवड:-

” एन एम के गोल्डन ” या जातीच्या सिताफळाची 2018 ला लागवड केली… या जातीच्या सीताफळाचे वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या प्रमाणात फळ धारण क्षमता आणि फळ तयार झालं तरी देठ सोडत नाही…फळ तोडल्यानंतर 4 थ्या दिवशी तयार होते. एक फळ 500ते 700 ग्रॅम भरते…लागवडी नंतर फक्त चार वर्षात फळ लागायला सुरुवात होते. केलसुला हा डोंगरी भाग आहे… इथे उन्हाळ्यात पाण्याची टंचाई आणि तापमान अधिक हमखास असते. केलसुला डोंगर जवळ आहे त्यामुळे रानटी जनावरं मोठ्या प्रमाणात पिकाची नासाडी करतात. सीताफळाच्या पानाचा उग्रवास असल्यामुळे कोणतेही रानटी जनावर ते खात नाही. अत्यल्प पाणी हवं असलेलं हे फळ आहे. याला जास्त पाणी झालेतर फळ कमी लागते. यावर्षी फूल धारण करतांना सुरुवातीला पाऊस कमी झाला त्यामुळे मोठ्या प्रमाणात फळं धरली गेली. आता झाड फळांनी लगडले आहेत.गेल्या दोन  दिवसा  याची तोड सुरु झालेली आहे 

* सीताफळ इतर पिकापेक्षा परवडते का ? :-

2018 ला दिड एकर शेतात  सिताफळ लागवड केली त्यानंतर आता पर्यंत दोन सिझन मिळाले आहे आत्ता पर्यन्त त्या सिताफळ लागवडीतून त्याना दिड  लाख रुपये मिळाले गेल्या वर्षी त्याना 50 हजार नफा मिळाला होता आणि आत्ता या वर्षी त्याना 1लाख रुपये नफा मिळाला आहे आत्ता पुढच्या वर्षी तीन लाख रुपये नफा मिळेल अशी आशा भूतेकर यांना आहे या वर्षी त्याना 20 किण्टल माल निघाला आहे 60 किलो प्रमाने दर मिळत आहे अश्या पहिल्या तोडित त्याना 1लाख 20 हजार रुपये मिळाले आहेत  त्याना वेळोवेळी सेनगाव येथील कृषी विभागाचे मार्गदर्शन देखिल घेतले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या