💥पुर्णा तालुक्यातील ताडकळस पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौ.उखळद व बलसात पोलिसांचा छापा अवैध दारु जप्त...!


💥गुन्हेगारांना पळता भुई थोडी करू - सहाय्यक पोलिस निरिक्षक सय्यद

पुर्णा (दि.27 डिसेंबर) - तालुक्यातील ताडकळस पोलिस स्थान मौजे उखळद तसेच बलसा येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या आरोपीवर ताडकळस पोलीस स्टेशनचे स.पो.नी. सय्यद यांनी आपले सहकारी कर्मचाऱ्यांसोबत छापा मारून गुन्हा दाखल केला.


मागील काही महिन्यात ताडकळस पोलीस स्टेशन च्या हद्दीत अवैध धंदे सुरू असलेल्या बातम्या बऱ्याच प्रसारित झाल्या परंतु येथून पुढे ताडकळस पोलीस स्टेशनच्या हद्दीत कसल्याही प्रकारचे अवैध धंदे चालू देणार नाही जर कोणी असल्या प्रकारचे अवैध धंदे करत असतील किंवा कोणतेही दखलपात्र गुन्हे करत असतील अशा गुन्हेगारांना पळता भुई थोडी निश्चितच करू

यावेळी ताडकळस पोलीस स्टेशनचे स.पो.नि.एम.जे सय्यद सोबत हेड कॉन्स्टेबल कांगणे , हेडकॉन्स्टेबल गरुड , पोलीस कॉन्स्टेबल सोळंके यांनी छापा टाकून आरोपी व तीन हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल पकडला असून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे

 तसेच बलसा या गावात सुद्धा सपोनी सय्यद यांच्यासोबत हेड कॉन्स्टेबल काळे पोलीस कॉन्स्टेबल सोळंके यांनी छापा टाकून 1740 रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या व आरोपी ताब्यात घेऊन ताडकस पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या