💥विभागीय क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवा - जिल्हाधिकारी आंचल गोयल


💥परभणी जिल्हा महसूल क्रीडा स्पर्धेला आजपासून सुरुवात💥


परभणी (दि.09 डिसेंबर) :- यावर्षी विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद औरंगाबाद जिल्ह्याकडे असून, परभणी जिल्ह्यातील संघात उत्तम नियोजन आणि लढाऊवृत्तीमुळे संघाने उत्कृष्ट कामगिरी केल्यास विभागीय स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक नक्कीच पटकावू, असा विश्वास जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी व्यक्त केला. तसेच जिल्हा महसूल क्रीडा स्पर्धेत सहभागी अधिकारी-कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.


परभणी जिल्हा महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2022 चे उद्घाटन जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या हस्ते आज शिवाजी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर दीपप्रज्ज्वलन करून झाले.ल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रश्मी खांडेकर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, दत्तु शेवाळे, अरुणा संगेवार, शैलेश लाहोटी, जिल्हा नियोजन अधिकारी किशोर परदेशी, जिल्हा पुरवठा अधिकारी मंजुषा मुथा, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, तहसीलदार सखाराम मांडवगडे, श्रीमती छाया पवार, सारंग चव्हाण, गणेश चव्हाण, पल्लवी टेमकर, गोविंद येरमे, दिदेश झांपले, श्रीमती प्रतीक्षा भुते, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर, जिल्हा तलाठी संघटनेचे अध्यक्ष मुकुंद आष्टीकर, जिल्हा मंडळ अधिकारी संघटनेचे अध्यक्ष मुकुंद आष्टीकर, जिल्हा कोतवाल संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बुलबुले, जिल्हा वाहनचालक संघटनेचे अध्यक्ष सुभाष कच्छवे, जिल्हा शिपाई संघटनेचे अध्यक्ष दिलीप डहाळे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.


एकाच स्पर्धेत दोघांनी सारख्या विषयावर सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सहभागी न होता, यावर्षी वेगवेगळे विषय घेऊन स्पर्धेत उतरण्याचे आवाहन करताना जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी नांदेड जिल्ह्याचा संघ मजबूत संघ आहे, हे लक्षात घेऊन तयारी करण्याचे आवाहन केले. तसेच परभणी संघामध्ये गुणवत्ता आणि जिंकण्याची चिकाटी असल्यामुळे संघ कुठेही कमी पडता कामा नये. गेल्यावेळी परभणीने दुसरा क्रमांक पटकावला असून, आता प्रथम क्रमांकच मिळवायचा आहे, तुमच्यामध्ये ती क्षमता आहे. जिल्हा प्रशासनातील सर्वजण पाठीशी आहोत, असेही त्यांनी सांगितले.


या वर्षात दुस-यांदा स्पर्धा होत असून, समोर वेगवेगळ्या जिल्ह्यांचे आव्हान आहे. सर्वांनी वेळेत येऊन सराव करावा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्यातील वेगळे टँलेंट समोर येत असून मे 2022 मध्ये नांदेड जिल्ह्यात स्पर्धा झाल्या होत्या. त्यावेळी परभणीला कमी लेखणारे सर्वजण आता मात्र परभणी संघाचा धसका घेतला आहे, ही जिल्ह्यासाठी आनंदाची बाब असल्याचे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सांगितले.अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे आणि निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी योग्य नियोजन केले असून, सर्व संघटनांचे अधिकारी -कर्मचारी सहभागी करून घेत आहेत. यावर्षी प्रथम क्रमांक पटकावण्याची संधी असून, त्यासाठी ही कमतरता भरुन काढण्याची  संधी असल्याचे त्यांनी सांगितले.


आतापर्यंतच्या विविध महसूल क्रीडा स्पर्धांमध्ये परभणी जिल्ह्याचा इतिहास चांगला आहे. क्रीडा स्पर्धेचे व्यवस्थापन आणि सराव हा जिंकण्यासाठी महत्त्वाचा आहे. जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी यावर्षी प्रथम क्रमांक पटकावण्याचे सांगितले असून, त्यासाठी नक्कीच प्रयत्न करू, असे अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांनी क्रीडा स्पर्धांच्या सरावाचे योग्य नियोजन केल्यामुळे विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये परभणीचे नाव नक्कीच उज्ज्वल कराल, अशा शब्दांमध्ये शुभेच्छा दिल्या निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी ‘करूया जागर श्रमाचा’ ब्रीदवाक्यानुरुप औरंगाबाद विभागात परभणी जिल्ह्याला प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करू, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. 

तहसीलदार संघटनेचे अध्यक्ष सखाराम मांडवगडे, नाना भेंडेकर, मुकुंद आष्टीकर यांचेही समयोचित भाषणेही झाली.प्रारंभी जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड, पाथरी आणि सेलू उपविभागाच्या संघांनी सलामी दिली. तसेच विविध क्रीडा प्रकारातील प्रशिक्षक संतोष कोकीळ, अनिल नलावडे, कैलास चेहरे, मनोज जाधव, पी. आर. जाधव, मंगेश काळदाते, अमोल मिताले, कैलास माने, पोलीस वाद्यवृंदाचे प्रमुख मेजर  विक्रम पंडीत यांचाही जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच करुणा बगाटे यांनी महिलांच्या 100 मिटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तर पुरुषांमधून ज्ञानेश्वर बुलबुले यांनी प्रथम क्रमांक पटकावला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या