💥जिंतूरात बिलावल भुट्टोच्या वक्तव्याचे निषेध......!


💥भारतीय जनता पार्टीच्या वतीने निदर्शने पाकीसतानी झेंडा जाळला💥

जिंतूर प्रतिनिधी  / बि.डी.रामपूरकर

जिंतूर : पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी वर केलेल्या अशोभनीय वक्तव्यावर शहरातील मुख्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात भारतीय जनता पार्टी जिंतूर च्या वतीने आज दि.१७ रोजी सकाळी ११ : ३० वा निषेध करण्यात आले.

           भिलावल भुट्टो यांनी न्यूयॉर्कमध्ये पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदीवर असभ्य भाषेत टीका केली होती. बिलावल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टीका करताना त्यांना पंतप्रधान होईपर्यंत अमेरिकेत येण्यास बंदी होती. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंतप्रधान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परराष्ट्रमंत्री आहेत, अशी टीका केली होती. या वक्तव्याचे भारतीय जनता पार्टी जिंतूरच्या वतीने पाकिस्तानचा झेंडा जाळून व घोषणा देऊन तीव्र असा निषेध करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण बुधवंत, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद कराड, डॉ.पंडित दराडे, दत्ता कटारे, संतोष राठोड, मनोहर सातपुते, हकीम भाई, बंटी जाधव, किशोर जाधव, विलास भंडारी, राजू चव्हाण, प्रदीप चौधरी, संदिप लकडे, आबा खेत्रे, सुमेध सुर्यवंशी, रमेश सडालं, गणेश दराडे, खिस्ते, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या