💥आयुर्वेद उपचाराने कर्क रोगाचे निदान प्रभावी : सरदार अमरजीतसिंघ गिल


💥अमर सेवा आश्रम ट्रस्टच्या माध्यमातून आयुर्वेद प्रणालीने पाच वर्षात 33 रुग्णांना लाभ💥 


नांदेड (दि.16 डिसेंबर) - वर्तमान परिस्थितीत कर्क रोगाचे प्रसार झपाट्याने होत आहे. कर्क रोगाच्या निदानासाठी एलोपैथी उपचार प्रणाली पेक्षा आयुर्वेद उपचार प्रणाली खूपच प्रभावशाली आहे. त्यामुळे कर्क रोगाच्या उपचार निदानासाठी शासनाने सुद्धा आयुर्वेद उपचार प्रणाली विषयी जनजागृती करावी अशी मागणी कर्क रोग उपचार क्षेत्रात भरीव योगदान देणारे अमर सेवा आश्रम ट्रस्ट चे संचालक सरदार अमरजीतसिंघ गिल यांनी नुकतेच केंद्रीय आरोग्य मंत्री तसेच राज्याचे आरोग्य मंत्री यांना पत्र पाठवून केली आहे. कर्क रोगाच्या उपचारात गरीब व सामान्य रुग्णांना लाभ मिळावे अशा धारणेने सक्रिय सेवा देणाऱ्या स. अमरजीतसिंघ गिल यांच्या कार्याचा गौरव हिंगोलीचे खासदार मा. हेमंत पाटिल यांनीही शुभेच्छा पत्राद्वारे केली आहे. 

अमरजीतसिंघ गिल यांनी पत्रात नमूद केले आहे की कर्क रोगाच्या प्रतिकारासाठी एलोपैथी उपचाराने शंभर मधून ऐनतेन दहा रुग्णांनाच लाभ पोहचतो. तसेच केमो थेरपी व रेडिएशन उपचारामुळे रुग्णास मोठे त्रास सहन करावे लगते. आयुर्वेद प्रणालित कर्क रोगाचे उपचार शक्य असून मागील पाच वर्षात अमर सेवा आश्रम ट्रस्ट नांदेड येथे कर्क रोगाचे 33 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन आज चांगले जीवन जगताहेत. 

वरील विषयी स. अमरजीतसिंघ गिल यांनी माहिती दिली की, नांदेडच्या शहीदपूरा भागात असलेल्या अमर सेवा आश्रमात सर्व प्रकारच्या कर्क रोगाच्या उपचारासाठी औषोदोपचार केले जात आहे. येथे उपचार घेऊन स्वस्थ होणाऱ्या रुग्णांचे सर्व विवरण उपलब्ध आहेत. सध्या महाराष्ट्र भरातून रुग्ण येथे उपचारासाठी येत आहेत. खूपच कमी खर्चात रुग्णांना उपचार दिले जात आहे.  याठिकाणी फक्त तंबाखूजन्य पदार्थ सेवन कारणाऱ्यांचे उपचार केले जात नाही असेही त्यांनी सांगितले. 

शासनास पाठवण्यात आलेल्या पत्रात त्यांनी मागणी केली आहे की जर गरीब व सामान्य रुग्ण असेल तर त्यांना अमर सेवा आश्रम ट्रस्ट येथे पाठविण्यात यावेत. सेवा तत्वाने रुग्णांना औषाधोपचार दिला जाईल. अमर सेवा आश्रम येथे उपचार घेऊन स्वस्थ झालेल्या रुग्णांनी देखील अमरजीतसिंघ गिल यांच्या कथनास दुजोरा दिला आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या