💥सामाजिक बांधिलकीचे भान जोपासत जनसामान्यांच्या सुख दुःखात धावून जाणार संवेदनशील मनाच व्यक्तिमत्व विजय बगाटे ......!


💥विजयजी बगाटे यांनी खऱ्या अर्थाने आंबेडकरी व धम्म चळवळीतील प्रबोधन चळवळीतील तेजस्वी रत्न💥

लेखकश्रीकांत हिवाळे पुर्णा

पुर्णा येथील कै.विठ्ठलराव मोरे मूकबधिर अस्ती व्यंग विद्यालयाचे मुख्याध्यापक समाज परिवर्तन व प्रबोधन क्षेत्रामध्ये कार्य करणारे प्रबोधन अकादमीचे अर्धयू राज्यातील वृत्तपत्र क्षेत्रातील आघाडीचे दैनिक असलेल्या दैनिक लोकमत या मराठी वृत्तपत्रात जवळपास तिन दशका पर्यंत अत्यंत जनहीतवादी वृत्तांकन करीत सातत्याने सामाजिक/शैक्षणिक क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेले पत्रकार म्हणून सन्माननीय विजयजी बघाटे सर यांनी निर्भीडपणे कर्तृत्व बजावल यानंतर दैनिक लोकमत वृत्त समुहातून स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर श्री.बगाटे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत आंबेडकरी चळवळीतील वर्तमानपत्रांना पाक्षिकांना वैचारिक लेख व बातम्या देण्याचे काम केले  मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मिळाव याकरिता जो रोमहर्षक लढा उभा राहिला त्या लढ्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेत आदरणीय विजयजी बगाटे यांनी खऱ्या अर्थाने आंबेडकरी व धम्म चळवळीतील प्रबोधन चळवळीतील तेजस्वी रत्न म्हणून नावलौकिक मिळवले पॅंथर चळवळ त्यांनी अनुभवली प्रत्यक्ष जगली पत्रकारितेमध्ये त्यांचं योगदान काळाच्या कसोटीला उतरलेले आहे.

मंडल आयोगाचे प्रणेते भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत व्ही.पी.सिंग मराठवाड्यामध्ये आले होते त्यावेळी त्यांनी घेतलेली त्यांची प्रकट मुलाखत थोर पंतप्रधान व्ही.पी.सिंग यांच्या स्वभावाचे विविध पैलू या मुलाखतीमध्ये त्यांनी हळुवारपणे उलगडवले  होते त्यांच्या मुलाखतीचे शिर्षक होतं "पेड कभी फल खाते क्या"मंडल आयोग अंमलबजावणी संदर्भामध्ये यावर त्यांनी भाष्य केलं होतं दैनिक लोकमतच्या माध्यमातून पूर्णा तालुक्याच्या शहराच्या समस्याच प्रतिबिंब दिसायचं.व संबंधित अधिकारी पदाधिकारी यावर सकारात्मक विचार करून समस्या सोडवण्यामध्ये अग्रभागी असत.मूकबधिर अस्थी व्यंग विद्यालयाचे मुख्याध्यापक या नात्याने त्यांचं कार्य सर्वश्रूत आहे कर्मचारी विद्यार्थी संस्थाचालक यांच्यामध्ये समन्वयाची भूमिका घेऊन हे विद्यालय त्यांनी नवा रूपास आणले.या विद्यालयामध्ये तीन दशकापेक्षाही जास्त समर्पितपणे वरतस्त सेवा केली.असं म्हटल्या जातं संस्कारातून घडतो माणूस या उक्तीप्रमाणे त्यांना घडविण्याचे काम त्यांच्या पूज्य आई दिवंगत राधाबाई  वडील हरिभाऊयांनी केले वडील रेल्वे विभागामध्ये पूर्णा या ठिकाणी रेल्वे सुरक्षा बल सेवेमध्ये पोलिस होते.

 आंबेडकरी व धम्म चळवळीचे केंद्र या चळवळीला वैचारिक धार आणण्यामध्ये आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला कमालीची मैत्रेय भावना किंचितसा विनोदी स्वभाव. स्वभाव मध्ये असलेला निर्भीडपणा कुणाविषयी कटुतेची भावना नसलेला त्यांचा स्वभाव प्रत्येकाला हवाहवासा वाटतो.फार मोठा मित्रपरिवार त्यांना लाभलेला आहे प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आणि अडचणीमध्ये ते सहभागी होत असतात असं म्हटलं जातं प्रतेक यशस्वी पुरुषा पाठीमागे एक स्त्री असते मग ती माता असेल भगिनी असेल पत्नी असेल विजय रावांना त्यांच्या सुविद्य पत्नी सूनिता ताई यांची समर्थ साथ आहे त्या एक संस्कारक्षम धम्मशील उपासिका आहेत.दोघेही पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महाथे रो यांचे श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आहेत पूज्य भंतेसोबत बुद्ध धम्म दर्शन सह ल त्याचप्रमाणे श्रीलंका थायलंड या बौद्ध देशांना त्यांनी भेटी दिले आहेत.

या दाम्पत्याने श्रीलंका येथून दुर्मिळ जातीचे वृक्षाचे रोप आणून बुद्ध विहाराच्या बागेमध्ये त्याचे वृक्षारोपण केले आहे.त्यांच्या वृक्षवेलीवर दोन फुले उमलली त्यांचे  चिरंजीव डॉक्टर विनय हे सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक आहेत हिंगोली जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय अधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत.डॉक्टर विनय यांच्या सुविद्या पत्नी डॉक्टर प्रतिभा ह्या स्किन स्पेशालिस्ट असून त्याही वैद्यकीय अधिकारी आहेत.त्यांची सुकन्या डॉ.प्राची यांनी बीडीएस शिक्षण पूर्ण करून त्याही सुद्धा डेंटिस्ट आहेत तीन दशकाच्या प्रदीर्घ सेवेनंतर विजयराव बगाटे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहे जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक प्राचार्य मोहनराव मोरे व प्राचा र्य रजनीताई भगत मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांचा सेवा निवृत्ती समारंभ विद्यालयामध्ये होत आहे.

या पुढील त्यांचं व कुटुंबाच आयुष्य भरभराटीचे जावो त्यांना आतू व आरोग्य व बल वैभव प्राप्त होवो पौर्णिमेच्या पूर्ण आल्हाद दायक चंद्रमा प्रमाणे त्यांचा आयुष्य प्रकाशमान हो वोही मंगलमय शुभेच्छा....!

शुभेच्छुक :- श्रीकांत हिवाळे सर अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पूर्णा जिल्हा परभणी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या