💥पुर्णा तालुक्यातील 'अवैध स्टोन क्रेशर' विरोधात अखेर महसुल प्रशासनाची कारवाई....!


💥तालुक्यातील ०९ अवैध स्टोन क्रेशर महसुल प्रशासनाने केले सिल : ईटीएस मोजणीसह दंडात्मक कारवाई देखील होणार💥


पुर्णा (दि.१६ डिसेंबर) - परभणी जिल्हा महसुल प्रशासन गौण खनिज विभागाच्या डोळ्यात धुळ झोकून बेकायदेशीर रित्या प्रचंड प्रमाणात स्फोटकांद्वारे दगडाचे उत्खनन करून जिल्हा महसुल प्रशासन दफ्तरी बंद असल्याचे भासवून लाखो रुपयांचा महसुल बुडवत चालणाऱ्या पुर्णा तालुक्यातील १३ अवैध स्टोन क्रेशर खानपट्टा (खदान) पैकी ०९ 'अवैध स्टोन क्रेशर' विरोधात आज शुक्रवार दि.१६ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११-०० वाजेच्या सुमारास तहसिलदार टेमकर व महसुल विभागाचे नायब तहसिलदार नितेशकुमार बोलेलू यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित भागातील मंडळ अधिकारी तलाठी यांनी कारवाई करीत अवैधरित्या चालणाऱ्या स्टोन क्रेशरांना' सिल ठोकण्याची कारवाई केली.

पुर्णेच्या तहसिलदार टेमकर व महसुल प्रशासनाचे नायब तहसिलदार नितेशकुमार बोलेलू यांच्या मार्गदर्शनाखाली सिल ठोकलेल्या अवैध स्टोन क्रेशरांमध्ये तालुक्यातील भाटेगाव येथील १ अवैध स्टोन क्रेशर,भाटेगाव येथील १ अवैध स्टोन क्रेशर,आडगाव (सु.) येथील १ अवैध स्टोन क्रेशर,आडगाव (ला.) येथील २ अवैध स्टोन क्रेशर,पुर्णा येथील १ अवैध स्टोन क्रेशर,कानखेड येथील १ अवैध स्टोन क्रेशर तर ताडकळस जिल्हा परिषद मधील ३ अवैध स्टोन क्रेशरचा या कारवाईत समावेश असून संबंधित स्टोन क्रेशर व खानपट्टा ताब्यात घेऊन महसुल प्रशासनाने सिल केले असून यानंतर खानपट्ट्यातील प्रचंड प्रमाणात झालेल्या उत्खननाचे भुमी अभिलेख विभागा मार्फत ईटीएस मोजनी करून संबंधित स्टोन क्रेशर खानपट्टा धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे महसुल प्रशासनाचे नायब तहसिलदार नितेशकुमार बोलेलू यांनी आमच्या प्रतिनिधिशी बोलतांना स्पष्ट केले.


💥तालुक्यात अनेक वर्षापासून शासनाचा लाखो रुपयांचा महसुल बुडवून चालणाऱ्या अवैध स्टोन क्रेशर कडे महसुल प्रशासनाचे दुर्लक्ष ?


जिल्हा महसुल व गौण खनिज विभागाच्या दफ्तरी पुर्णा तालुक्यात काही मुद्दत संपलेले तर काही बंद असल्याची नोंद असलेले एकंदर १३ अवैध स्टोन क्रेशर तालुक्यात राजरोसपणे प्रचंड प्रमाणात ब्लास्टींग करून दगडाचे उत्खनन करीत त्यापासून स्टोन क्रेशरच्या माध्यमातून गिट्टीची निर्मिती करीत हजारो ब्रास गिट्टी शासकीय गुत्तेदारांसह खाजगी बांधकामांना असंख्य वाहनांतून पुरवठा करीत असतांना तहसिल पल्लवी टेमकर व महसुल प्रशासन झोपेचे सोंग घेत होते की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या