💥पुर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथील शेतकऱ्यांचे नागपूर विधिमंडळा समोर आमरण उपोषण....!


💥उपकार्यकारी अभियंता यांची चौकशी व जमिनीचा मावेजा मिळावा यासाठी कालपासून आमरण उपोषणाला सुरुवात💥

धानोरा काळे/ प्रतिनिधी 

       पूर्णा तालुक्यातील ताडकळस- धानोरा काळे हा रस्ता १६ फुटाचा शिव रस्ता असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने परस्पर विनासहमती या रस्त्याचे राज्यमार्ग 235 असे नामकरण करून विनासहमती भूसंपादन केले असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वेळोवेळी तक्रारी दाखल करूनही कोणतीही कार्यवाही होत नाही तसेच जिल्हाधिकारी परभणी,विभागीय आयुक्त संभाजीनगर ,जिल्हाधिकारी यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांनाही लेखी निवेदन दिली परंतु कोणताच मार्ग निघाला नसल्यामुळे धानोरा काळे येथील शेतकऱ्यांनी थेट नागपूर येथील चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विधिमंडळासमोर सा. बां.विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांची चौकशी व जमिनीचा मावेजा मिळावा यासाठी दिनांक 19 डिसेंबर पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.



              ताडकळस ते धानोरा काळे हा रस्ता १६ फुटाचा शिवरस्ता होता परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने उपकार्यकारी अभियंता श्री विघ्ने यांनी दडपशाही व पोलीस बळाचा वापर करून हा रस्ता 30 मीटरचा केला असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी व जिल्हा परिषद परभणी यांचेकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही त्यामुळे बेकायदेशीर शेतकऱ्याच्या शेतातून होत असलेला हा रस्ता व त्यासाठी जबरदस्ती व पोलीस बलाचा वापर करून काम करीत असलेल्या सा. बां.विभगाचे उपकार्यकारी अभियंता विरुद्ध कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी धानोरा काळे येथील शेतकरी थेट नागपूर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशन विधिमंडळा समोर दिनांक 19 डिसेंबर पासून शेतकरी विष्णू काळे उपसरपंच कैलास काळे मोतीराम काळे सुभाष काळे जनार्दन काळे बालासाहेब काळे जनक काळे निवृत्ती वाघमारे मारुती काळे जगन्नाथ काळे आधी शेतकरी न्यायासाठी आमरण उपोषण करीत आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या