💥परभणी शहरात प्रहार जनशक्ती पक्षच्या वतीने उद्या आनंदोत्सव साजरा होणार - प्रहार जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने


💥मागील २५ वर्षांपासून राज्यात दिव्यांगांचे एक स्वतंत्र मंत्रालय असावे या राज्य शासनाकडे रेटून धरलेल्या मागणीला यश💥 

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा.आ.बच्चूभाऊ कडू यांच्या राजकीय व समाजिक लढाई ला यश आले असून मागील २५ वर्षांपासून दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कासाठी मा.आ.बच्चूभाऊ कडू यांचा लढा चालू आहे. मागील २५ वर्षांपासून राज्यात दिव्यांगांचे एक स्वतंत्र मंत्रालय असावे या राज्य शासनाकडे रेटून धरलेल्या मागणीला यश आले असून राज्य शासनाने राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय मंजूर केले आहे.

मा.आ.बच्चूभाऊ यांच्या मागणीला आलेल्या यशाचा जल्लोष साजरा करण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र यायचे आहे, परभणी तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधव व प्रहार जनशक्ती पक्षाच्या परभणी तालुक्यातील सर्व पदाधिकारी, सर्व शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सुचित करण्यात येत आहे की, उद्या दि. १२ नोव्हेबर २०२२, शनिवार दुपारी १२ वाजता परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दिव्यांग मंत्रालयाच्या मंजुरीचा जल्लोष साजरा करण्यासाठी आपल्या परिसरातील दिव्यांग बांधवासह उपस्थित राहावे ही ही विनंती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या