💥बालगृहातील विद्यार्थ्यांची जिल्हा न्यायालय,जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे भेट...!


💥या ठिकाणी चालणारे कामकाजाची माहिती समजावून घेतली💥

परभणी (दि.18 नोव्हेंबर) : दि.14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2022 या कालावधीत जिल्ह्यात 'बालहक्क सप्ताह' साजरा करण्यात येत आहे.  बालहक्क सप्ताहनिमित्त आज परभणी जिल्ह्यातील महिला व बालविकास अंतर्गत येणाऱ्या बालगृहातील विद्यार्थ्यांनी जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय  येथे भेट देवून या ठिकाणी चालणारे कामकाजाची माहिती समजावून घेतली. 

जिल्हा न्यायालय येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. लांडगे यांनी विद्यार्थ्यांना न्यायालय दाखवून येथील कामकाजाची पद्धत समजावून सांगितली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा पुरवठा अधिकारी मंजुषा मुथा यांनी विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाची कामकाज व्यवस्था समजावून सांगितली. तर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यलयात जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीमती रागसुधा यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तर श्रीमती गाडेकर यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील कामकाजासंदर्भात मार्गदर्शन केले. 

या भेटीमुळे विद्यार्थ्यांना शासकीय तसेच न्यायालयीन यंत्रणांची कामकाज पद्धती समजली. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक गोविंद अंधारे, श्री. कायंदे, श्री. राम,परिविक्षा अधिकारी श्रीमती मनतकर, बालगृहातील सर्व कर्मचारी, चाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक संदीप बेंडसुरे यांनी केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या