💥शेततळे अस्तरीकरणासाठी शेतकऱ्यांना अर्ज आमंत्रित.....!


💥असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजय लोखंडे यांनी केले आहे💥

परभणी (दि.24 नोव्हेंबर) - एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2022-23 व राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत सामूहिक व वैयक्तिक शेततळे अस्तरीकरणासाठी अनुदान देण्यात येत आहे.त्यानुसार जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी  महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विजय लोखंडे यांनी केले आहे.

पाणीसाठा निर्माण करणे व साठवलेले पाणी वाया जावू नये, तसेच उन्हाळ्यात फळबागा जगविण्यासाठी साठविलेल्या पाण्याचा वापर व्हावा, या हेतूने 50 टक्के अनुदानावर ही योजना राबविण्यात येत आहे.  शेतक-यांनी स्वखर्चाने अथवा विविध शासकीय योजनेतून शेततळे खोदकाम केले आहे, अशा पात्र शेतक-यांनी तसेच एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गंत 100 टक्के अनुदानावर शेततळ्याची योजना राबविण्यात येत आहे. या दोन्ही योजनांमध्ये पात्र असलेल्या शेतक-यांनी   महाडीबीटी (mahadbtmahait.gov.in) पोर्टलवर अर्ज करावेत, तसेच अधिक माहितीसाठी कृषि कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या