💥पुर्णा येथील श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात रस्ता सुरक्षा शिबिर संपन्न.....!


💥या शिबिरास प्रमुख मार्गदर्शक म्हणून परभणी येथील परिवहन अधिकारी जयेश देवरे यांची प्रामुख्याने उपस्थिती💥


पूर्णा. (प्रतिनिधी) - येथील श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभागाकडून रस्ता सुरक्षा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . या शिबिरास प्रमुख मार्गदर्शक म्हणून परभणी येथील परिवहन अधिकारी श्री जयेश देवरे तसेच सहाय्यक परिवहन निरीक्षक श्री ज्ञानेश्वर कांबळे  व श्रीमती चारुशीला फुलपगारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रस्त्यावरील आपले आणि इतर सर्वांचे संरक्षण करण्यासाठी रहदारीचे नियम पाळणे, तसेच अपघातात होणारी हाणी टाळण्यासाठी वाहतूक नियमाची माहिती  त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकामार्फत  समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी,तसेच वैयक्तिक विकासासाठी  विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिकेचे वितरण करण्यात आले.

सुरक्षित वाहन चालवणे ,वाहन परवाना ,वाहतुकीचे नियम , संभाव्य धोके  अति वेगाने वाहन चालवल्यास होणारे दुष्परिणाम  याच्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय दळवी  सदरील रस्ता सुरक्षा शिबिराराच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाधिकारी डॉ. पुष्पा गंगासागर यांनी सूत्रसंचालन केले व डॉ. अजय कुऱ्हे यांनी आभार माणले. या शिबिरास  विद्यार्थीयांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी  प्रा.सिद्धांत ढवळे , कालिदास वैद्य व गजानन भालेराव यांनी परिश्रम घेतले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या